मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /बॉलिवूडचे दिग्गज क्रिकेटच्या मैदानात! विरोधी टीम्समध्ये खेळले होते राज कपूर-दिलीप कुमार, पाहा VIDEO

बॉलिवूडचे दिग्गज क्रिकेटच्या मैदानात! विरोधी टीम्समध्ये खेळले होते राज कपूर-दिलीप कुमार, पाहा VIDEO

दिलीप कुमार (Dilip Kumar dies) यांना सिनेमासह क्रिकेटचंही वेड होतं. त्यांनी 1962 साली एका अविस्मरणीय मॅचमध्ये कॅप्टनसी केली होती. त्यांच्यासमोर राज कपूर यांची टीम (Dilip Kumar vs Raj kapoor Cricket Match) होती.

मुंबई, 7 जुलै: ज्येष्ठ कलाकार दिलीप कुमार यांचे बुधवारी (7 जुलै सकाळी निधन (Dilip Kumar dies) झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या जाण्यानं संपूर्ण चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.  भारतामध्येच नाही तर पाकिस्तानमध्येही त्यांचे लाखो फॅन्स होते. दिलीप कुमार यांना सिनेमासह क्रिकेटचंही वेड होतं. संधी मिळाल्यावर ते क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरत असत.

दिलीप कुमार यांनी 1962 साली एका अविस्मरणीय मॅचमध्ये कॅप्टनसी केली होती. त्यांच्यासमोर राज कपूर यांची टीम होती. दोन्ही टीममध्ये मैत्रीपूर्ण लढत (Dilip Kumar vs Raj kapoor Cricket Match) झाली. चित्रपट कामगारांसाठी निधी गोळा करणे हा या मॅचचा हेतू होता.

दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्यात गाढ मैत्री होती. दोघांचेही लहानपण पेशावरमध्ये गेले आहे. मुंबईमध्ये दोघेही सुपरस्टार झाले. त्यानंतरही त्यांच्यातील मैत्री कायम होती. त्याचे उदाहरण 1962 साली झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये पाहयला मिळाले. ही मॅच राज कपूर यांच्या टीमनं जिंकली. तरीही दिलीप कुमार त्यांचा मित्र जिंकला म्हणून आनंदी झाले होते. या मॅचमध्ये दिलीप कुमारनं राज कपूर यांच्या बॉलिंगवर शानदार फोर लगावले होते.

" isDesktop="true" id="575856" >

या मॅचमध्ये हास्य कलाकार आयएस जोहर आणि जॉनी वॉकर यांनी त्यांच्या खास शैलीत सर्वांचं मनोरंजन केलं. जॉनी वॉकर कधी पिचवर पळत होते, तर कधी सावकाश चालत होते, हे आपण व्हिडीओमध्ये पाहू शकतो. राज मेहरा यांनू या मॅचचं कॉमेंट्री केली होती. ही मॅच पाहण्यासाठी प्रेक्षकांनीही मोठी गर्दी केली होती.

मोहम्मद युसूफ खान कसे झाले दिलिप कुमार? वाचा नावामागची काय होती कहाणी

मायनगरीच्या स्टार्सचा समावेश असलेल्या या मॅचमध्ये मस्ती आणि कॉमेडी यांचे मिश्रण होते. प्राण, शम्मी कपूर, शशी कपूर महमूद, मनोज कुमार, राजेंद्र कुमार, नंदा हे कलाकार यामध्ये सहभागी झाले होते. या मॅचमध्ये दोन्ही टीमनी एकमेकांना प्रोत्साहन दिले. विशेषत: राज कपूर आणि दिलीप कुमार यांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या टीमचा उत्साह वाढवला ते पाहून सर्वजण प्रभावित झाले होते.

First published:
top videos

    Tags: Cricket, Dilip kumar, Video