जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / भारत- वेस्ट इंडिज मालिकेवर कोरोनाचे ढग, BCCI घेणार मोठा निर्णय

भारत- वेस्ट इंडिज मालिकेवर कोरोनाचे ढग, BCCI घेणार मोठा निर्णय

भारत- वेस्ट इंडिज मालिकेवर कोरोनाचे ढग, BCCI घेणार मोठा निर्णय

देशभर वेगाने वाढणाऱ्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फटका भारतीय क्रिकेटला देखील बसला आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील वन-डे आणि टी20 मालिकेवर कोरोनाचं संकट आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 जानेवारी: देशभर वेगाने वाढणाऱ्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फटका भारतीय क्रिकेटला देखील बसला आहे. रणजी क्रिकेट स्पर्धेसह (Ranji Cricket Trophy 2022) तीन महत्त्वाच्या स्पर्धा बीसीसीआयने यापूर्वीच अनिश्चित काळासाठी स्थगित केल्या आहेत. त्यानंतर पुढच्या महिन्यात होणाऱ्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील वन-डे आणि टी20 मालिकेवर कोरोनाचं संकट आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात फेब्रुवारीमध्ये 3 वन-डे आणि तितक्याच टी20 सामन्यांची मालिका होणार आहे. 6 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये या मालिकेतील पहिला वन-डे सामना होईल. या मालिकेतील यजमान शहरांची संख्या कमी करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. ‘या विषयावर सध्या कोणताही निर्णय झालेला नाही. पण, सतत परिस्थिती बदलत आहे. आमचं त्यावर लक्ष असून आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ,’ अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं दिली आहे. अहमदाबादसह जयपूर, कोलकाता, कटक, विशाखापट्टणम आणि तिरुअनंतपुरममध्ये या मालिकेतील सामने होणार आहेत. 6 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान ही मालिका होणार आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआय 3 शहरांमध्येच 6 सामन्यांचे आयोजन करण्याची शक्यता आहे. अमिताभ बच्चन यांना मागावी लागली सचिन तेंडुलकरची माफी! नियोजित कार्यक्रमानुसार वेस्ट इंडिजची टीम 1 फेब्रुवारी रोजी भारतामध्ये दाखल झाल्यानंतर अहमदाबादमध्ये तीन दिवस आयसोलेशनमध्ये राहणार आहे. वन-डे टीमचा नियमित कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) या मालिकेसाठी फिट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय फॅन्सना याची मोठी उत्सुकता आहे. रोहित दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीमध्ये केएल राहुल (KL Rahul) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील वन-डे मालिकेत टीम इंडियाचा कॅप्टन आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात