अमिताभ बच्चन यांनी शनिवारी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. त्यामध्ये सचिन तेंडुलकर लीजेंड्स क्रिकेट लीग (Legends Cricket League) स्पर्धेत खेळणार असल्याचे सांगितले होते. त्यावर सचिन ही स्पर्धा खेळणार नसल्याचे स्पष्टीकरण त्याच्या मॅनेजमेंटने दिले. त्यामुळे अमिताभ यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी तो व्हिडीओ डिलिट करत माफी मागितली. (Instagram)
लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलियासह अन्य देशांचे निवृत्त झालेले क्रिकेटपटू खेळणार आहेत. यामध्ये वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, मोहम्मद कैफी, जॉन्टी ऱ्होडस, केव्हिन पीटरसन, वासिम अक्रम, शोएब अख्तर या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे. त्यांची इंडिया महाराजा, एशिया लॉयन्स आणि वर्ल्ड जायंट्स या टीममध्ये विभागणी केली जाईल. (Instagram)