मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

मुंबई इंडियन्सचा खेळाडू ऑस्ट्रेलियाकडून खेळणार, कॅप्टन फिंचनं केलं जाहीर

मुंबई इंडियन्सचा खेळाडू ऑस्ट्रेलियाकडून खेळणार, कॅप्टन फिंचनं केलं जाहीर

मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) आयपीएल स्पर्धा गाजवलेल्या खेळाडूची लवकरच ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये निवड होणार असल्याचे संकेत कॅप्टन आरोन फिंचनं दिले आहेत.

मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) आयपीएल स्पर्धा गाजवलेल्या खेळाडूची लवकरच ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये निवड होणार असल्याचे संकेत कॅप्टन आरोन फिंचनं दिले आहेत.

मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) आयपीएल स्पर्धा गाजवलेल्या खेळाडूची लवकरच ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये निवड होणार असल्याचे संकेत कॅप्टन आरोन फिंचनं दिले आहेत.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 30 मे : आयपीएल 2022 स्पर्धा आता संपली आहे. या स्पर्धेत जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू सहभागी झाले होते. या स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीकडं फक्त भारतीय निवड समितीचं नाही तर क्रिकेट विश्वातील अन्य निवड समितीचंही लक्ष होतं. यावर्षी टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) ऑस्ट्रेलियात होणार आहे. ऑस्ट्रेलियानं मागील वर्षी हा वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामुळे यंदा त्यांना वर्ल्ड कप राखण्याचं आव्हान आहे. मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) आयपीएल स्पर्धा गाजवलेला टीम डेव्हिड (Tim David) आमच्या योजनेचा भाग आहे, असं ऑस्ट्रेलियाचा वन-डे आणि टी20 टीमचा कॅप्टन आरोन फिंच (Aaron Finch) यानं सांगितलं आहे. डेव्हिडनं यापूर्वी सिंगापूरकडून 14 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. पण, त्यानं ऑस्ट्रेलियात आजवर एकही प्रथमश्रेणी सामना खेळलेला नाही. पुढील महिन्यात श्रीलंकेविरूद्ध होणाऱ्या टी20 मालिकेसाठी डेव्हिडचा ऑस्ट्रेलियन टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही, पण त्याला लवकरच संधी मिळेल, असं फिंचनं सांगितलं आहे. 'तो गेल्या काही काळापासून जबरदस्त फॉर्मात आहे. आयपीएलमधील शेवटच्या सामन्यात त्यानं दमदार कामगिरी केली. तो चांगल्या लयीत होता. पहिल्या बॉलपासून आक्रमक खेळण्याचं त्याच्याकडं दुर्मिळ कौशल्य आहे. ते त्यानं अनेकदा सिद्ध केलंय. तो सातत्यपूर्ण खेळ करत आहे. आम्ही त्याचा आगामी काळात निश्चित विचार करू,' असे फिंचने सांगितले. IPL 2022 : रोहित, धोनीला जमलं नाही ते हार्दिकनं केलं, फायनलमध्ये केला जबरदस्त रेकॉर्ड डेव्हिडची दमदार कामगिरी मुंबई इंडियन्सनं टीम डेव्हिडला आयपीएल लिलावात 8 कोटी 25 लाखांना खरेदी केले होते. मुंबईनं डेव्हिडला सुरूवातीच्या काही सामन्यानंतर वगळले. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात त्याचा समावेश करण्यात आला. आयपीएल 2022 मध्ये मुंबईची कामगिरी निराशाजनक झाली असली तरी डेव्हिडनं प्रभावी कामगिरी केली. त्यानं 8 सामन्यात 37.20 च्या सरासरीनं 186 रन केले. आयपीएलमध्ये त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 216.27 इतका होता. मुंबई इंडियन्सचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर डेव्हिड सध्या इंग्लंडमध्ये टी20 क्रिकेट खेळत आहे.
First published:

Tags: Australia, Ipl 2022, Mumbai Indians

पुढील बातम्या