• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WI vs AUS: ब्राव्होनं एका हातानं लगावला कडक सिक्स, पाहा VIDEO

WI vs AUS: ब्राव्होनं एका हातानं लगावला कडक सिक्स, पाहा VIDEO

ब्राव्होनं (Dwayne Bravo) या खेळीच्या दरम्यान तीन सिक्स लगावले. त्यामध्ये त्यानं एश्टन अगरच्या बॉलिंगवर एका हाताने सिक्स लगावला. ब्राव्होने मारलेला हा सिक्स थेट स्टेडियमच्या बाहेर गेला. या सिक्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे

 • Share this:
  मुंबई, 11 जुलै : वेस्ट इंडिजनं दुसऱ्या टी20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा ( WI vs AUS) 56 रननं पराभव केला. या विजयाबरोबरच वेस्ट इंडिजनं 2-0 अशी मालिकेत आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजनं पहिल्या बॅटींग करताना 20 ओव्हर्समध्ये 4 आऊट 196 रन काढले. त्याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाची टीम 140 रनवरच ऑल आऊट झाली. पहिल्यांदा बॅटींग करताना वेस्ट इंडिजची सुरूवात चांगली झाली नाही. लेंडल सिमन्स (Lendl Simmons), आंद्रे फ्लेचर (Andre Fletcher)  आणि ख्रिस गेल (Chris Gayle) हे तिघे लवकर आऊट झाले. त्यानंतर शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) आणि ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) या दोघांनी वेस्ट इंडिजची इनिंग सांभाळली. त्यांनी आक्रमक खेळ केला. ब्राव्होनं बॅटींगमध्ये प्रमोशन मिळाल्याचा पूर्ण फायदा घेतला. त्याने 34 बॉलमध्ये नाबाद 47 रन काढले. ब्राव्होनं या खेळीच्या दरम्यान तीन सिक्स लगावले. त्यामध्ये त्यानं एश्टन अगरच्या बॉलिंगवर एका हाताने सिक्स लगावला. ब्राव्होने मारलेला हा सिक्स थेट स्टेडियमच्या बाहेर गेला. या सिक्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ब्राव्हो-हेटमायर जोडीनं चौथ्या विकेटसाठी 61 बॉलमध्ये 103 रन जोडले. यापैकी हेटमायरनं 58 तर ब्राव्होनं 38 रन काढले. ब्राव्होनं त्याच्या 47 रनच्या खेळीत तीन सिक्स आणि एक फोर लगावला. तर हेटमायरनं 36 बॉलमध्ये 61 रनची खेळी केली. यामध्ये त्याने 2 फोर आणि 4 सिक्स लगावले. रसेल -ब्राव्होनं केली ऑस्ट्रेलियाची धुलाई, वेस्ट इंडिजचा सलग दुसरा विजय पहिल्या मॅचमध्येही वेस्ट इंडिज विजयी शनिवारी झालेल्या पहिल्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं ऑस्ट्रेलियाचा 18 रनने पराभव केला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 147 रनचं आव्हान होतं. ऑस्ट्रेलियानं विजयाच्या दिशेनं भक्कम वाटचाल सुरु केली होती. ऑस्ट्रेलियाला 10 ओव्हरनंतर विजयासाठी 41 रन हवे होते आणि त्यांच्या 5 विकेट्स शिल्लक होत्या. त्यानंतर मकॉयच्या (Obed McCoy) भेदक बॉलिंगमुळे मॅच फिरली. मकॉयनं 26रन देत 4 विकेट्स घेतल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची टीम 16 ओव्हरमध्येच 127 रनवर ऑल आऊट झाली.
  Published by:News18 Desk
  First published: