मुंबई, 21 जुलै : वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 1-4 असा मोठा पराभव झाला होता. या नामुश्कीनंतर ऑस्ट्रेलियाने वन-डे मालिकेत जोरदार कमबॅक केलं आहे. ऑस्ट्रेलियानं ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटींग करत 49 ओव्हरमध्ये 9 आऊट 252 रन काढले होते. त्याला उत्तर देताना वेस्ट इंडिजची टीम 26.2 ओव्हर्समध्येच 123 रनवर ऑल आऊट झाली. डकवर्थ लुईस मेथडनं ऑस्ट्रेलियानं पहिल्या वन-डेमध्ये वेस्ट इंडिजचा 133 रननं दणदणीत पराभव केला आहे. पावसामुळे ही मॅच एक ओव्हरनं कमी करण्यात आली होती.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क (Mitchell Starc) हा सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्याने 48 रन देत 5 विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजच विरुद्धच्या पहिल्या तीन टी20 सामन्यात स्टार्कनं निराशा केली होती. त्यानंतर स्टार्कने चौथ्या सामन्यात आंद्रे रसेल विरुद्ध शेवटची ओव्हर अचूक टाकत ऑस्ट्रेलियाला त्या मालिकेतील एकमेव विजय मिळवून दिला. त्या कामगिरीनंतर आत्मविश्वास वाढलेल्या स्टार्कनं ऑस्ट्रेलियाला आणखी एक विजय मिळवून दिला आहे.
What a performance! Our boys were excellent in all facets of the game and recorded a big 133-run victory in the first ODI against the West Indies.
Game two is on Friday #WIvAUS pic.twitter.com/AzMo02OuUX — Cricket Australia (@CricketAus) July 21, 2021
स्टार्कच्या भेदक माऱ्यापुढे अगदी पहिल्या बॉलपासून वेस्ट इंडिजच्या बॅट्समननं लोंटागण घातले. स्टार्कला जोश हेजलवूडनं 3 विकेट्स घेत चांगली साथ दिली. झम्पा आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. वेस्ट इंडिजकडून कॅप्टन कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याने सर्वाधिक 56 रन केले.
दीपक चहरचा धमाका, टीम इंडियाचा रोमांचक विजय
त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा काळजीवाहू कॅप्टन अॅलेक्स कॅरीनं (Alex Carey) अर्धशतक झळकावले. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आरोन फिंचला दुखापत झाल्यानं तो या वन-डे मध्ये खेळू शकला नाही. अॅश्टन टर्नरनं 49 रन करत कॅरीला चांगली साथ दिली. या दोघांनी सहाव्या विकेट्ससाठी 111 रनची पार्टनरशिप केली. वेस्ट इंडिजकडून हेडन वॉल्शनं 39 रन देत 5 विकेट्स घेतल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Cricket, West indies