Home /News /sport /

'या' खेळाडूची निवड ठरली ऐतिहासिक, 46 वर्षात पहिल्यांदाच घडली अशी घटना

'या' खेळाडूची निवड ठरली ऐतिहासिक, 46 वर्षात पहिल्यांदाच घडली अशी घटना

इंग्लंड दौऱ्यावर स्टँडबाय म्हणून अर्झान नागवासवाला (Arzan Nagwaswalla) या 23 वर्षांच्या खेळाडूची निवड झाली आहे. टीम इंडियात निवड होताच गुजरातच्या या बॉलरनं इतिहास रचलाय.

    मुंबई, 8 मे : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यातल्या (India vs England) 5 टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची शुक्रवारी घोषणा झाली. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली इंग्लंडला जाणाऱ्या या टीममध्ये अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर दुखापतीनंतर काही जणांचं कमबॅक झाल्यानं टीम इंडिया आणखी मजबूत बनली आहे. इंग्लंड दौऱ्यावर स्टँडबाय म्हणून अर्झान  नागवासवाला (Arzan Nagwaswalla) या 23 वर्षांच्या खेळाडूची निवड झाली आहे. टीम इंडियात निवड होताच गुजरातच्या या बॉलरनं इतिहास रचलाय. अर्झन भारतीय क्रिकेट टीममध्ये 46 वर्षांनतर निवड झालेला पारशी क्रिकेटपटू आहे. (Parasi cricketer in Team India after 46 years) यापूर्वी भारताकडून फारुख इंजिनिअर (Farokh Enginner) यांनी भारताकडून 1975 साली शेवटची टेस्ट मॅच खेळली होती. तर पारशी महिला क्रिकेटपटूंचा विचार केला तर भारतीय महिला क्रिकेट टीममधील शेवटच्या पारशी क्रिकेटपटू या डायना एल्डूजी (Diana Edulji) या आहेत. त्यांनी 1993 साली शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळली आहे. कोण आहे अर्झान? पारशी समाजाचा असलेल्या अर्झान नागवासवालाचा जन्म 17 ऑक्टोबर 1997 साली गुजरातच्या सुरतमध्ये झाला. घरामध्ये क्रिकेटची कोणतीही पार्श्वभूमी नसताना नागवासवालाने लहान वयातच बॉल हातात घेतला. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने फेब्रुवारी 2018 साली पदार्पण केलं. 2018-19 च्या मोसमात अर्झान प्रकाशझोतात आला जेव्हा त्याने मुंबईविरुद्ध 5 विकेट घेतल्या. अर्झानने मुंबईविरुद्धच्या या मॅचमध्ये सूर्यकुमार यादव, अरमान जाफर, आदित्य तरे, धृमील मटकर आणि सिद्धेश लाड यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. 2019-20 च्या रणजी ट्रॉफीमध्येही तो चमकला. गुजरातकडून खेळताना रणजी ट्रॉफीच्या मोसमात 8 मॅच खेळून अर्झानने तब्बल 41 विकेट घेतल्या, यात त्याने तीनवेळा 5 विकेट आणि एकदा 10 विकेट घेतल्या. यावर्षी विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही अर्झानने त्याचा फॉर्म कायम ठेवला. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत अर्झानला 9 विकेट तर विजय हजारे ट्रॉफीमध्ये 19 विकेट मिळाल्या. IPL 2021 गाजवल्यानंतर आवेश खान इंग्लंडला जाणार! 'या' दोघांना दिलं यशाचं श्रेय स्थानिक क्रिकेटमध्ये केलेल्या या कामगिरीमुळे निवड समितीने अर्झानवर विश्वास दाखवला आणि त्याची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल आणि इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी स्टॅण्ड बाय खेळाडू म्हणून निवड झाली. अर्झान डावखुरा फास्ट बॉलर असून न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट आणि नील वॅगनर यांच्या बॉलिंगचा अंदाज यावा म्हणून त्याचा नेटमध्ये भारतीय  बॅट्समनला मोठा उपयोग होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, India vs england, New zealand, Parsi, Team india

    पुढील बातम्या