Home /News /sport /

IPL 2021 गाजवल्यानंतर आवेश खान इंग्लंडला जाणार! 'या' दोघांना दिलं यशाचं श्रेय

IPL 2021 गाजवल्यानंतर आवेश खान इंग्लंडला जाणार! 'या' दोघांना दिलं यशाचं श्रेय

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका यासाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा झाली आहे. या टीममध्ये दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) फास्ट बॉलर आवेश खान (Avesh Khan) याची स्टँडबाय म्हणून निवड झाली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 8 मे : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आणि इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका यासाठी 20 सदस्यांच्या टीम इंडियाची (Team India) घोषणा झाली आहे. या टीममध्ये दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) फास्ट बॉलर आवेश खान (Avesh Khan) याची स्टँडबाय म्हणून निवड झाली आहे. आवेशनं आयपीएल 2021 (IPL 2021) मधील 8 मॅचमध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं या चांगल्या कामगिरीचं श्रेय दोन व्यक्तींना दिलं आहे. "मी यंदा (दिल्ली कॅपिटल्सचे) सर्व सामने खेळले. मी चांगली बॉलिंग केली. टीमनं देखील मॅच जिंकल्या. मला जबाबदारी देण्यात आली. मी त्याचा पूर्ण वापर केला. मी मॅचच्या सर्व टप्प्यात बॉलिंग केली.  टीमचे कोच आणि कॅप्टननं माझा आत्मविश्वास वाढवला." असं आवेशनं टीममध्ये निवड झाल्यावर सांगितलं. दोन वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी आवशेनं यंदा दिल्ली कॅपिटल्सकडून सर्व आठ सामने खेळले. तर 2017 ते 2019 या काळात त्याला फक्त नऊ आयपीएल सामन्यांमध्ये संधी मिळाली होती. आवेश देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून खेळतो. त्यानं 26 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 100 विकेट्स घेतल्या आहेत. तर यंदाच्या मुश्ताक अली स्पर्धेत 5 मॅचमध्ये 14 विकेट्स घेतल्या होत्या. इतकचं नाही तर गेल्या दोन रणजी सिझनमध्ये मध्य प्रदेशकडून सर्वात जास्त विकेट्सही आवेशच्याच नावावर आहेत. आवेशनं यावेळी सांगितलं की, " गेल्या दोन सिझनपासून मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. मात्र आयपीएलमुळे मला प्रसिद्धी मिळाली." टेस्ट आणि T20 क्रिकेटमध्ये बॉलिंग करण्यामध्ये काय फरक आहे हे विचारल्यावर आवेशनं उत्तर दिलं की, "टेस्टमध्ये लाईन आणि लेन्थ यावर फोकस करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संयम देखील गरजेचा आहे. तुम्ही जितका संयम ठेवून बॉलिंग कराल तितकं चागलं." IPL 2021: कोरोनातून बरा झालेला CSK चा दिग्गज म्हणाला, 'भारतामध्ये परिस्थिती गंभीर पण...' यशाचं श्रेय कुणाला? आवेशनं यावेळी आयपीएलमधील चांगल्या कामगिरीचं श्रेय दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) आणि कॅप्टन ऋषभ पंत (Rishabh Pant) या दोघांना दिलं. "रिकी पॉन्टिंग यांनी मला बॉलिंग करताना 100 टक्के देण्याचा सल्ला दिला होता. तर पंतनं देखील कॅप्टन म्हणून नेहमी मदत केली. मी त्याच्याबरोबर यापूर्वी देखील खेळलो आहे. मॅचमध्ये झालेल्या चुकांबद्दल आम्ही (मी आणि ऋषभ) मॅच संपल्यावर चर्चा करत होतो." असं आवेशनं स्पष्ट केलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi capitals, India vs england, IPL 2021, Team india

    पुढील बातम्या