मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : रोहितला आऊट करण्यासाठी धोनी रचणार चक्रव्यूह, हिटमॅन देणार का उत्तर?

IPL 2022 : रोहितला आऊट करण्यासाठी धोनी रचणार चक्रव्यूह, हिटमॅन देणार का उत्तर?

MI vs CSK: आयपीएल इतिहासातील दोन सर्वात यशस्वी टीममध्ये आज (गुरूवार) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर लढत होणार आहे. या सामन्यात रोहित शर्माला (Rohit Sharma) आऊट करण्यासाठी महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) खास चक्रव्यूह रचणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 12 मे : आयपीएल इतिहासातील दोन सर्वात यशस्वी टीममध्ये आज (गुरूवार) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर लढत होणार आहे. मुंबई इंडियन्सचा विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) यांच्यात या सिझनमधील ही दुसरी लढत आहे. यापूर्वी झालेल्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) फटकेबाजीमुळे सीएसकेनं मुंबईच्या विजयाचा घास हिसकावला होता. आता धोनी पुन्हा एकदा सीएसकेचा कॅप्टन झाला आहे. आयपीएल 'प्ले ऑफ' मधील आव्हान कायम ठेवण्यासाठी सीएसकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सामना जिंकावा लागेल.

या दोन्ही टीममध्ये यापूर्वी झालेल्या सामन्यात मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माला (Rohit Sharma) डावखुरा फास्ट बॉलर मुकेश चौधरीनं आऊट केलं होतं. आता आजच्या सामन्यातही रोहित बॅटींगला आल्यावर मुकेश त्याला बॉलिंग करेल. त्याचबरोबर धोनी दुसऱ्या बाजूनं सीएसकेचा स्पिनर महीश थीक्षानाला बॉल देऊ शकतो.

रोहित शर्मा या आयपीएल सिझनमध्ये रन काढण्यासाठी संघर्ष करतोय. स्पिन बॉलर्ससमोर तर त्याची बॅट एकदम शांत आहे. आयपीएल 2022 मध्ये रोहितनं स्पिन बॉलरच्या विरूद्ध 32 बॉलमध्ये 33 रन केले असून यामध्ये तो 4 वेळा आऊट झाला आहे. रोहितच्या या कमकुवत बाजूचा फायदा घेण्यासाठी धोनी सुरूवातीलाच त्याला आऊट करण्यासाठी मुकेश आणि महीशचं खास चक्रव्यूह रचणार आहे.

3 IPL टीमकडून खेळलेल्या भारतीय खेळाडूवर गुन्हा दाखल, गंभीर आरोपांची होणार चौकशी

रोहित शर्मा फॉर्मात नसला तरी तो सेट झाल्यावर धोकायदाक खेळाडू आहे हे धोनीला चांगलं माहिती आहे. सीएसके विरूद्धही त्याचा रेकॉर्ड चांगला आहे. रोहितनं सीएसके विरूद्ध 30 सामन्यांमध्ये 752 रन केले आहेत. यामध्ये 7 अर्धशतकांचा समावेश आहे. मुंबई इंडि्यन्सनं या सिझनमध्ये 11 पैकी फक्त 2 सामने जिंकले असून त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. सीएसकेनं 11 पैकी 4 सामने जिंकले असून पॉईंट टेबलमध्ये ते सध्या नवव्या क्रमांकावर आहेत. सीएसकेला 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश करण्यासाठी उरलेले तीन्ही सामने मोठ्या फरकानं जिंकणे आवश्यक असून अन्य निकालांवरही अवलंबून राहावं लागणार आहे.

First published:

Tags: Cricket, Csk, Ipl 2022, MS Dhoni, Mumbai Indians, Rohit sharma