मुंबई, 30 जानेवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) ही टेस्ट सीरिज जिंकून टीम इंडियानं इतिहास घडवला आहे. भारतीय टीमचा पहिल्या टेस्टमध्ये दणदणीत पराभव झाला होता. त्यानंतर पुढच्या तीन टेस्टमध्ये टीमनं कमबॅक केलं. अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्त्वाखाली भारतीय टीमनं 2-1 असा विजय मिळवला.
भारतीय टीममधल्या विजयी हिरोंचं मायदेशात जंगी स्वागत झालं. अजिंक्यच्या स्वागतासाठी तर त्याची पूर्ण सोससायटी गेटवर जमा झाली होती. त्यांनी अगदी रेड कार्पेट टाकून अजिंक्यचं स्वागत केलं. हा आनंद साजरा करण्यासाठी सोसायटीच्या मंडळींनी खास कांगारू केक बनवला होता. तो केक कापण्यास अजिंक्यनं नकार दिला होता. अजिंक्यचा तो व्हिडीओ (VIDEO) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
अजिंक्यनं दिलं कौतुकास्पद उत्तर
अजिंक्यनं कांगारू केक का कापला नाही? हा प्रश्न त्यावेळी अनेकांना पडला होता. प्रसिद्ध क्रिकेट कॉमेंट्रेटर हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये अजिंक्यनं या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
कांगारू हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे. मी तो केक कापला नाही कारण मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. तुम्ही प्रतिस्पर्धी टीमला हरवलं, अगदी इतिहास रचला तरी विरोधी टीमचा सन्मान करायला हवं, असं मला वाटतं. त्यामुळेच मी तेंव्हा केक कापण्यास नकार दिला होता,’’ असं कौतुकास्पद उत्तर अजिंक्यनं दिलं आहे.
Always wanted to ask @ajinkyarahane88 about the cake he was offered with a kangaroo on it and why he refused to cut it. The small things that tell you more about a person. More of this conversation on his FB page. pic.twitter.com/YZwwQKlFJq
— Harsha Bhogle (@bhogleharsha) January 30, 2021
घरी आल्यानंतर अजिंक्य रहाणेचं सोसायटीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. विठ्ठल कामत यांची सून आदिती लिमये यांच्या कामत बेकरीमध्ये अजिंक्य रहाणेसाठी खास केक बनवण्यात आला होता.
अजिंक्य रहाणेला चॉकलेट आवडत असल्याने पूर्ण चॉकलेटचा हा केक बनवण्यात आला. यातल्या अजिंक्यच्या फोटोभोवती दिसणारी गोल्डन फोटो फ्रेमही खाता येईल, अशीच बनवण्यात आली होती.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिली टेस्ट पाच फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या टेस्टसाठी अजिंक्य सध्या संपूर्ण टीमसोबत चेन्नईमध्ये आहे. सध्या सर्व खेळाडू सहा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहेत. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर भारतीय टीमला सराव करण्याची परवानगी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajinkya rahane, Cricket