मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /...तर मनोविकारांचा करावा लागेल सामना; विराट कोहली, रोहित शर्मा, रहाणेसारख्या खेळाडूंबद्दल व्यक्ती केली चिंता!

...तर मनोविकारांचा करावा लागेल सामना; विराट कोहली, रोहित शर्मा, रहाणेसारख्या खेळाडूंबद्दल व्यक्ती केली चिंता!

हे खेळाडू मानसिकदृष्ट्या आजारी पडतील अशी भीती व्यक्त केली जात आहे

हे खेळाडू मानसिकदृष्ट्या आजारी पडतील अशी भीती व्यक्त केली जात आहे

हे खेळाडू मानसिकदृष्ट्या आजारी पडतील अशी भीती व्यक्त केली जात आहे

नवी दिल्ली, 29 जानेवारी : भारतीय क्रिकेट टीमचे माजी मानसिक आरोग्य प्रशिक्षक पॅडी अप्टन यांनी (Paddy Upton) BCCI (भारतीय क्रिकेट बोर्ड) सह जगातील क्रिकेट टीमचा सविस्तर अभ्यास केला आहे. अधिक काळातपर्यंत जैव सुरक्षित वातावरणात (बायो बबल) राहिल्यामुळे खेळाडूंना मानसिक आजाराची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोना महासाथीदरम्यानही क्रीडा स्पर्धा सुरू झाल्यापासून आंतरराष्ट्रीय खेळाडूंना जैव-सुरक्षित वातावरणात राहावं लागत आहे. तर अनेक क्रिकेटर आणि टेनिस खेळाडू याचा प्रभावामुळे होणाऱ्या मानसिक स्वास्थ्याबाबत आपलं मत व्यक्त करीत आहेत.

अप्टन पुढे म्हणाले की, क्रीडा टीममधील वरिष्ठ याकडे फारस लक्ष देत नसल्याचं दिसत आहे. पॅडी अप्टन म्हणतात की, सर्व खेळाडूंसाठी हे एक समान आव्हान आहे. दुसरीकडे आम्ही विविध खेळाडूंकडून फिडबॅक घेण्यासाठी शोध केलेला नाही. मात्र आरोग्यासंबंधित लोक म्हणतात की, जोपर्यंत आम्ही परीक्षण करीत नाही, तोपर्यंत आम्ही यासंदर्भात एखाद्या औषधांची परवानगी देऊ शकत नाही.

खेळाडू मानसिकदृष्ट्या आजारी पडतील

अप्टन म्हणाले, 'जगात अनेक बायो बबल तयार केले गेले आहेत परंतु मी मोठ्या प्रमाणात असे काही पाहिले नाही, ज्यामध्ये आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद), बॅडमिंटन किंवा फुटबॉलशी संबंधित लोक किंवा बीसीसीआय पदाधिकाऱ्यांनी याचा परिणाम समजून घेण्यासाठी खेळाडूंकडून अभिप्राय मिळवून अभ्यासाबद्दल विचार केला असेल. ते म्हणाले की, आम्ही अद्याप त्याचे दुष्परिणाम पाहिलेले नाहीत. परंतु जैव-सुरक्षित वातावरणात सतत राहिल्यामुळे आपल्याला अधिक मानसिक समस्या आणि आजारांना सामोरे जाण्याची शक्यता आहे."

अप्टन यांचं म्हणणं आहे की, या समस्यातील काहींवरील उपाय शक्य आहे. मात्र अद्याप या मार्गाने कोणीही प्रयत्न करीत असल्याचे दिसत नाही. ते म्हणाले की, यापैकी काहींचा बचाव शक्य आहे. मात्र आम्ही यासाठी काही करीत नाही. यामुळे आपल्याला अशी समस्या दिसत नाही, तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागले. आणि हे खेळाडूंसाठी दुर्देवी आहे. भारतीय क्रिकेट टीमचे खेळाडून सतत 6 महिने बायो बबलमध्ये राहिले. आयपीएलनंतर टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेले. आता ते इंग्लंड विरोधात टेस्ट, वनडे आणि टी20 सीरीज खेळणार आहेत आणि यादरम्यान देखील खेळाडून अधिक काळासाठी बायो बबलमध्ये राहतील.

.

First published:
top videos

    Tags: Cricket, Virat kohali