मुंबई, 6 जून : टीम इंडियाच्या शेवटच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या आठवणी (India tour of Australia) आजही सर्वांच्या मनात ताज्या आहेत. भारतीय टीमच्या या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार असलेल्या अजिंक्य रहाणेचा आज वाढदिवस (Ajinkya Rahane Birthday) आहे. अजिंक्यनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये टीम इंडियाची कॅप्टनसी केली. त्या दौऱ्यात भारतीय टीम वारंवार अडचणीत सापडली होती. त्या सर्व अडचणीत अजिंक्य खंबीरपणे उभा राहिला. त्याच्या या खंबीर कॅप्टनसीमुळेच टीम इंडियानं ती सीरिज 2-1 नं जिंकली. टीम इंडियातील शांत खेळाडू अशी ओळख असलेल्या अजिंक्यनं त्या दौऱ्यात अंपायरला देखील सुनावले होते.
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीमध्ये झालेली तिसरी टेस्ट हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांच्या झुंजार बॅटींगमुळे नेहमी लक्षात राहणार आहे. या टेस्टमध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या भारतीय बॉलर्सना वर्णद्वेषी टिप्पणी सहन करावी लागली. या प्रकरणात अजिंक्यनं खंबीर भूमिका घेत खेळाडूंची पाठराखण केली. अजिंक्यनं स्वत: एका प्रमोशनल कार्यक्रमात त्या टेस्टच्या दरम्यान अंपायरशी झालेल्या चर्चेचा खुलासा केला होता.
सिडनी टेस्टच्या तिसऱ्या दिवशी अजिंक्यनं प्रेक्षकांच्या वर्तणुकीबाबत अंपायरकडं तक्रार केली होती. त्यानंतर चौथ्या दिवशीही तोच प्रकार झाला. त्यावेळी 10 मिनिटं खेळ थांबला होता. अजिंक्य त्या प्रसंगाबद्दल बोलताना म्हणाला की, 'चौथ्या दिवशी सिराज माझ्याकडं आला. त्यावेळी आम्ही शिवीगाळ करणाऱ्या प्रेक्षकांना स्टेडिअममधून बाहेर काढण्याची मागणी केली. त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. ही कारवाई होईपर्यंत आम्ही मॅच खेळणार नाहीत, असं मी अंपायर्सना सांगितलं.
अंपायरनं त्यावर मला आम्ही खेळ थांबवू शकत नाहीत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बाहेर जा असा सल्ला दिला. त्यावर, आम्ही इथं खेळण्यासाठी आलो आहोत, ड्रेसिंग रूममध्ये बसण्यासाठी नाही. तुम्ही शिवीगाळ करणाऱ्यांना मैदानाच्या बाहेर काढा असे सांगितले. त्या दिवशी सिराजबरोबर घडलं ते चूक होतं. त्याला पाठिंब्याची गरज होती.' असे अजिंक्यनं स्पष्ट केले.
Happy Birthday Ajinkya : बॉलिवूड कथेप्रमाणे आहे अजिंक्य - राधिकाची लव्ह स्टोरी
टीम इंडियानं सिडनीमध्ये झालेली तिसरी टेस्ट ड्रॉ केल्यानंतर अॅडलेडमध्ये झालेली चौथी टेस्ट जिंकून चार टेस्टची मालिका 2-1 या फरकानं जिंकली. ऑस्ट्रेलियामध्ये सलग दोन टेस्ट सीरिज जिंकणारी आपली एकमेव आशियाई टीम आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.