Home /News /sport /

IPL 2021, KKR vs DC: चेन्नई विरुद्धच्या पराभवानंतर पंतची डोकेदुखी वाढली, दिग्गज खेळाडूला करणार बाहेर?

IPL 2021, KKR vs DC: चेन्नई विरुद्धच्या पराभवानंतर पंतची डोकेदुखी वाढली, दिग्गज खेळाडूला करणार बाहेर?

आयपीएल 2021 च्या फानयलमध्ये चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) लढत कोणत्या टीमविरुद्ध होणार हे आज (बुधवारी) स्पष्ट होणार आहे. या मॅचपूर्वी दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतची (Rishabh Pant) डोकेदुखी वाढली आहे.

    मुंबई, 13 ऑक्टोबर: आयपीएल 2021 च्या फानयलमध्ये चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) लढत कोणत्या टीमविरुद्ध होणार हे आज (बुधवारी) स्पष्ट होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Kolkata Knight Riders vs Delhi Capitals) यांच्यात शारजाहमध्ये दुसरी क्वालिफायर मॅच होणार आहे. या मॅचमध्ये विजयी होणारी टीम फायनलमध्ये प्रवेश करणार आहे.ऋषभ पंतच्या (Rishbah Pant) दिल्ली कॅपिटल्सचा फायनलमध्ये जाण्याची ही शेवटची संधी आहे. या मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला तर पहिल्या आयपीएल विजेतेपदाची त्यांची प्रतीक्षा आणखी लांबणार आहे. दिल्ली कॅपिटल्सनं (DC) गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. सलग 3 आयपीएल प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारी ती एकमेव टीम आहे. गरजेप्रमाणे प्लेईंग 11 ची निवड ही दिल्लीची सर्वात मोठी शक्ती आहे. ऑलराऊंडर मार्कस स्टॉईनिस जखमी असूनही दिल्लीनं लीग फेजमध्ये पहिला क्रमांक पटकावला. पण, चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध झालेल्या पराभवानंतर दिल्लीच्या टीमचं संतुलन बिघडलं असल्याचं लक्षात आलं आहे. पंतची डोकेदुखी वाढली दिल्लीचा अनुभवी बॉलर आर. अश्विन (R. Ashwin) याचा फॉर्म टीमसाठी डोकेदुखी बनला आहे. अश्विननं आयपीएल स्पर्धेच्या सेकंड हाफमधील 7 मॅचमध्ये फक्त 4 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला 3 मॅचमध्ये एकही विकेट मिळालेली नाही. अश्विननं या आयपीएल सिझनमध्ये 12 मॅचमध्ये 60.80 च्या सरासरीनं 49 च्या स्ट्राईक रेटनं फक्त 5 विकेट्स घेतल्या आहेत. या स्पर्धेत किमान 40 ओव्हर्स टाकणाऱ्या बॉलर्समध्ये त्याची सरासरी आणि स्ट्राईक रेट सर्वात खराब आहे. काही मॅचमध्ये तर त्यानं त्याचा कोटा देखील पूर्ण केलेला नाही. त्यामुळे अश्विन केकेआर विरुद्ध खेळणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे. सुनील नरीनच्या परफॉर्मन्सवर Wasim Jaffer भलताच खूश; भन्नाट Tweet Viral दिल्लीच्या अक्षर पटेल आणि ललित यादव या स्पिनर्सपेक्षाही अश्विनचा इकोनॉमी रेट जास्त आहे. अश्विननं 12 मॅचमध्ये 7.44 च्या इकॉनोमी रेटनं 304 रन दिले आहेत. तर अक्षरनं 11 मॅचमध्ये 6.52 च्या इकोनॉमी रेटनं 274 रन दिले आहेत. टीमचा मुख्य स्पिनर असलेल्या अश्विनचा खराब फॉर्म दिल्लीसाठी अडचणीचा बनला आहे. कारण, त्यामुळे अन्य बॉलर्सविरुद्ध दबाव वाढत आहे. चेन्नईविरुद्ध झालेल्या पहिल्या क्वालिफायरमध्येही तेच घडलं. त्या मॅचमध्ये अश्विननं फक्त 2 ओव्हर्स बॉलिंग केली. दिल्लीच्या पराभवाचं ते देखील एक कारण होतं. IPL 2021 गाजवणारा आणखी एक खेळाडू T20 वर्ल्ड कप खेळणार! BCCI चा आदेश अश्विन प्लेईंग 11 मध्ये असल्यानं अनुभवी लेग स्पिनर अमित मिश्राला (Amit Mishra) बाहेर बसावं लागलं आहे. त्यानं या आयपीएलमध्ये 4 मॅचमध्ये 14 च्या स्ट्राईक रेटनं 6 विकेट्स घेतल्या आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi capitals, IPL 2021, KKR

    पुढील बातम्या