• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • RCB vs KKR: स्पिनर सुनील नरीनच्या परफॉर्मन्सवर Wasim Jaffer भलताच खूश; भन्नाट Tweet Viral

RCB vs KKR: स्पिनर सुनील नरीनच्या परफॉर्मन्सवर Wasim Jaffer भलताच खूश; भन्नाट Tweet Viral

RCB vs KKR; स्पिनर सुनील नरीनच्या परफॉर्मन्सवर wasim jaffer चे भन्नाट ट्विट

RCB vs KKR; स्पिनर सुनील नरीनच्या परफॉर्मन्सवर wasim jaffer चे भन्नाट ट्विट

केकेआरचा दिग्गज फिरकी गोलंदाज सुनील नरीनने (Sunil Narine)संघाच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली. सामन्यादरम्यानचा नरीनचा जबरा परफॉर्मन्स पाहून माजी दिग्गज क्रिकेटपटू वसीम जाफर(wasim jaffer did funny post after sunil naren fantastic performance) भलाताच खुश झाला असल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या भन्नाट ट्विटने क्रिकेट जगतातील सर्वांचे लक्ष वेधले आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 12 ऑक्टोबर : आयपीएल २०२१(IPL2021) मधील ५८ वा आणि प्लेऑफमधील एलिमिनेटर सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्सने(RCBvsKKR) या सामन्यात चार विकेट्सने विजय मिळवला. केकेआरचा दिग्गज फिरकी गोलंदाज सुनील नरीनने (Sunil Narine)संघाच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली. सामन्यादरम्यानचा नरीनचा जबरा परफॉर्मन्स पाहून माजी दिग्गज क्रिकेटपटू वसीम जाफर(wasim jaffer did funny post after sunil naren fantastic performance) भलाताच खुश झाला असल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या भन्नाट ट्विटने क्रिकेट जगतातील सर्वांचे लक्ष वेधले आहे. वसीम जाफर नेहमीच सोशल मीडियावर सतर्क असतो आणि चाहत्यांसाठी सतत मजेदार मीम शेअर करतो. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात सुनीलने केलेल्या कामगिरीनंतरही त्यांनी एक खास ट्वीट केले आहे. सुनीलने या सामन्यात आरसीबीच्या चार महत्वाच्या विकेट्स घेतल्या. यामध्ये कर्णधार विराट कोहली, एबी डिविलियर्स, ग्लेन मॅक्सवेल आणि श्रीकर भरत या दिग्गज बॅट्समनचा समावेश आहे. हे वाचा- VIDEO : RCB चा कर्णधार म्हणून विराटचा प्रवास संपला; पाहा कोहलीची प्रतिक्रिया सुनीलच्या गळाला सामन्यात हे चार मासे लागले असल्यामुळे जाफरने याच आशयाचे एक मीम शेअर केले आहे. त्यांनी शेअर केलेल्या मीममध्ये एक मासे पकडणारा दिसत असून त्याला एकाच प्रयत्नात चार मासे मिळाल्याचे दिसत आहे. तसेच या सोबत त्याने कॅप्शनमध्ये Sunil Narine tonight असे म्हटले आहे. सामन्याच्या सुरुवातीला आरसीबीने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, फलंदाजीमध्ये आरसीबीला अपेक्षित धावसंख्या गाठता आली नाही. आरसीबीने मर्यादित २० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या बदल्यात १३८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, केकेआरने १९.४ षटकात ६ विकेट्सच्या बदल्यात १३९ धावा केल्या आणि सामन्यात विजय मिळवला. सुनील नरीनला मॅन ऑफ द मॅच निवडले गेले.
  Published by:Dhanshri Otari
  First published: