Home /News /sport /

IPL 2021 गाजवणारा आणखी एक खेळाडू T20 वर्ल्ड कप खेळणार! BCCI चा आदेश

IPL 2021 गाजवणारा आणखी एक खेळाडू T20 वर्ल्ड कप खेळणार! BCCI चा आदेश

टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) निवडण्यात आलेले काही क्रिकेटपटून खराब फॉर्म आणि दुखापतीनं ग्रस्त असल्यानं निवड समितीची चिंता वाढली आहे.

    मुंबई, 13 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) निवडण्यात आलेले काही क्रिकेटपटून खराब फॉर्म आणि दुखापतीनं ग्रस्त असल्यानं निवड समितीची चिंता वाढली आहे. वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेत कोणतीही रिस्क घेण्याची बीसीसीआयची (BCCI) तयारी नाही. त्यामुळे आयपीएल स्पर्धा (IPL 2021) गाजवणाऱ्या खेळाडूंना स्टँडबाय म्हणून थांबवण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) टीमचं नेतृत्त्व करणाऱ्या संजू सॅमसनला (Sanju Samson) पुढील सूचना मिळेपर्यंत यूएईमध्ये थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सॅमसनच्या टीमला आयपीएल प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्यात अपयश आले, पण त्यानं चांगली बॅटींग करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. संजू सॅमसननं आयपीएल 2021 मधील 14 मॅचमध्ये 40 च्या सरासरीनं 484 रन काढले आहेत.यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानं यूएईमधील पिचवर 82 आणि नाबाद 70 रनची खेळी केली आहे. यूएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि राहुल चहर (Rahul Chahar) या टी20 वर्ल्ड कपमध्ये निवड झालेल्या खेळाडूंनी निराशाजनक कामगिराी केली आहे. आयएनएसच्या रिपोर्टनुसार पुढील सूचना मिळेपर्यंत सॅमसनला यूएईमध्येच थांबण्याचा आदेश बीसीसीआयनं दिला आहे. T20 World Cup: टीम इंडियाची लवकरच घोषणा! 4 नव्या खेळाडूंना मिळणार संधी टी-20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) बॅट्समन म्हणून खेळण्याची शक्यता आहे, कारण त्याच्या फिटनेसवर अजूनही प्रश्न आहेत. आयपीएलमध्येही पांड्याने बॉलिंग केली नाही. केकेआरचा ऑलराऊंडर व्यंकटेश अय्यरने या मोसमात उल्लेखनीय कामगिरी केली. 8 सामन्यांमध्ये 38 च्या सरासरीने त्याने 265 रन केले, यात दोन अर्धशतकं आहेत. अय्यरचा स्ट्राईक रेटही 123 चा आहे, याशिवाय त्याने 3 विकेटही घेतल्या आहेत. हार्दिकचा बॅकअप म्हणून अय्यर टीममध्ये असेल. आता अय्यर प्रमाणेच संजू सॅमसनच्या पर्यायावरही बीसीसीआय विचार करत आहे. 'काही जणांना आता छान झोप लागेल', विराटनं कॅप्टनसी सोडताच डिविलियर्सचं वक्तव्य VIDEO भारतीय टीम: विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BCCI, Sanju samson, T20 world cup

    पुढील बातम्या