गांगुलीचा प्लॅन देशाला नडणार? कोरोनाची दहशत असताना पत्करला धोका

गांगुलीचा प्लॅन देशाला नडणार? कोरोनाची दहशत असताना पत्करला धोका

भारतातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएललाही कोरोनाचा फटका बसू शकतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 मार्च : जगभरात कोरोना व्हायरसचा (CoronaVirus) धोका दिवसेंदिवस वाढत आहे. चीनच्या वुहान प्रांतापासून सुरू झालेला हा विषाणू आता भारतातही दाखल झाला आहे. जयपूर आणि दिल्लीसारख्या शहरांसह आतापर्यंत देशात 39 कोरोना रुग्णांचा नोंद झाली आहे. एकीकडे कोरोनामुळे जगाची अर्थव्यवस्था कोलमडली असताना कोरोना विषाणूचा खेळावरही परिणाम होत आहे.

जगातील प्रमुख देशांनी कोरोना विषाणूमुळे कित्येक मोठ्या खेळांचे कार्यक्रम रद्द केले किंवा पुढे ढकलले आहेत. भारतातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएललाही याचा सगळ्यात मोठा झटका बसू शकतो. मात्र असे असले तरी, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली मात्र आयपीएल स्पर्धा होणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. याआधी महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री राजेश टोपे यांनी आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याबाबत विचार केला जाणार असल्याचे सांगितले.

आयपीएलवर कोरोनाचे संकट

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2020) तेरावा हंगाम 29 मार्चपासून सुरू होणार आहे. लीगच्या सर्व 8 संघांनी जोरात त्याची तयारी सुरू केली आहे. चेन्नईमध्ये महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना या मोठ्या खेळाडूंनी सराव करण्यास सुरुवात केली आहे, तर इतर संघातील खेळाडूदेखील याची तयारी करत आहेत आणि तयारी करत आहेत. मात्र ही स्पर्धा सुरू होण्याच्या 3 आठवड्यांपूर्वीच कोरोना विषाणूने भारतात शिरकाव केला आहे. आतापर्यंत देशात 39 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळं आयपीएल रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे. भारतातील दाट लोकसंख्या असलेल्या भागात याचा प्रसार झाल्यास संपूर्ण देश संकटात येईल. आयपीएलमुळे मैदानात गर्दी वाढते. एक सामना पाहण्यासाठी जवळ जवळ 50 ते 60 हजार लोक उपस्थित असतात. अशा वेळी कोरोना विषाणूचा फैलाव होण्याचा धोका अधिक असेल.

वाचा-कोरोनामुळे IPL स्पर्धा पुढे जाण्याची शक्यता, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

आयपीएल पुढे ढकलल्यास काय होईल?

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमियर लीग पुढे ढकलली गेली तर ते कधी होणार असा प्रश्न आहे. कारण आयपीएल खेळण्यासाठी टीम इंडिया व अन्य खेळाडूंकडे मे नंतर वेळ नसेल. आयपीएलनंतर लगेचच भारताला आशिया चषक, विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धा खेळाव्या लागतील, मग आयपीएलची तारीख कशी ठरविली जाईल? म्हणजे कोरोनामुळे आयपीएल पुढे ढकलली जाणार नाही तर सरळ रद्द होईल. आयपीएल रद्द झाल्यामुळे बीसीसीआयला मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच, आठही संघांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळं सौरव गांगुली आयपीएल व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे.

वाचा-कोरोनाचा IPLला धोका; मुंबई, चेन्नई संघाचे ‘हे’ मुख्य खेळाडू खेळणार नाहीत?

टी-20 प्रीमिअर लीगला स्थगिती

भारतात होणाऱ्या आयपीएल या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगलाही ग्रहण लागले आहे. मात्र आता कोरोनामुळे टी -20 प्रीमिअर लीग पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लीगमध्ये गेलसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. कोरोना विषाणूचा क्रिकेटला बसलेला हा दुसरा मोठा झटका आहे.

वाचा-कोरोनाव्हायरसमुळे IPLवर टांगती तलवार! बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती

विदेशी खेळाडूही चिंतेत

आयपीएलमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी खेळाडू सहभागी असतात. मात्र आता खेळाडू आणि क्रिकेट बोर्डही खेळाडूंना इतर देशांमध्ये पाठवण्यासाठी तयार नाही आहेत. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने व्यक्त केली आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने कोरोनाव्हायरस संबंधित चिंता व्यक्त केली आहे. न्यूझीलंड बोर्डाच्या म्हणण्यानुसार, आयपीएल दरम्यान ते आपल्या प्रत्येक खेळाडूला कोरोनाव्हायरस अपडेट देईल. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह एकूण 6 खेळाडू आयपीएल 2020 खेळणार आहेत.

BCCIने नेमणार सल्लागार समिती

सध्या बीसीसीआयने 29 मार्चपासून सुरू होणार्‍या आयपीएल आणि कोरोनाव्हायरसच्या संबंधित कोणतेही मार्गदर्शक सूचना देश-विदेशातील खेळाडूंना देण्यात आलेले नाहीत. वास्तविक, आयपीएल दरम्यान सेल्फी आणि ऑटोग्राफ घेण्यासाठी ाचाहते मोठ्या संख्येने येतात अशा परिस्थितीत बीसीसीआय लवकरच खेळाडू व अधिकाऱ्यांसाठी सल्ला आणि मार्गदर्शक सूचना जारी करू शकेल. इंग्लंडचा संघ सध्या श्रीलंका दौर्‍यावर आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने यापूर्वीही खेळाडूंना कोणाशीही हात मिळवू नये असे सांगितले आहे.

First published: March 8, 2020, 7:41 PM IST

ताज्या बातम्या