सिडनी, 14 मार्च : कोरोनाव्हायरसच्या (Corona Virus) वाढच्या दहशतीचा फटका क्रीडा विश्वालाही बसला आहे. कोरोनामुळे अनेक स्पर्धा तसेच क्रिकेट सामनेही रद्द करण्यात आले आहेत. तर, काही खेळाडूंनाही कोरोनाची लागण झाली आहे. यआधी ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज केन रिचर्डसन (Kane Richadson) याची तब्येत खराब झाल्यामुळे त्याची तपासणी करण्यात आली. आता न्यूझीलंडचा जलद गोलंदाज लॉकी फर्ग्यूसनचेही नाव या लिस्टमध्ये सामिल झाले आहे. लॉकी फर्ग्यूसन आयपीएलमध्ये धोनीसोबत खेळला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होत आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यातच लॉकी तब्येत खराब झाली. त्यामुळे लगेचच त्याची Covid-19 टेस्ट करण्यात आली. अद्याप त्याचा रिपोर्ट आलेला नाही. तर, कोरोनामुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यीतल एकदिवसीय मालिका स्थगित करण्यात आली आहे.
वाचा-VIDEO : कोरोनामुळे क्रिकेटपटूंची फजिती, मैदानात प्रेक्षक नसताना काय घडलं पाहा
JUST IN: The ongoing #AUSvNZ ODI series and Australia's upcoming away series in New Zealand have both been postponed amid growing COVID-19 concerns. pic.twitter.com/XNx29nwsdH
— ICC (@ICC) March 14, 2020
वाचा-भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकाही रद्द, कोरोनामुळे BCCI ने घेतला निर्णय
केन रिचर्डसनचा रिपोर्ट निगेटिव्ह
केन रिचर्डसनचे रिपोर्ट आल्यानंतर त्याला कोरोना नसल्याचे समोर आले आहे. दक्षिण आफ्रिका दौर्या वरुन परत आल्यानंतर केन रिचर्डसनचा घसा खवखवणे आणि घसा खवखवणे, त्यानंतर त्याची चाचणी घेण्यात आली आहे. शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यांसाठी रिचर्डसनला त्वरित संघातून वगळण्यात आले होते. मात्र त्याचे रिपोर्ट नकारात्मक आल्यामुळे तो पूर्णपणे सुरक्षित आहे.
वाचा-BREAKING: कोरोनामुळे IPL लांबणीवर, 29 मार्चऐवजी 15 एप्रिलपासून सुरू होणार
CSKने रद्द केला सराव
आयपीएलचा तेरावा हंगाम कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे 29 मार्चपासून सुरू होणारी स्पर्धा आता 15 एप्रिलपासून होणार आहे. दरम्यान, काही संघांनी आपला सराव करण्यात सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या भीतीपोटी चेन्नई सुपर किंग्ज संघाने सराव रद्द केला आहे. धोनीसह संघातील इतर खेळाडू चेन्नईच्या मैदानावर सराव करत आहेत. मात्र कोरोनामुळे हा सराव रद्द करण्यात आला आहे.