नवी दिल्ली, 13 मार्च : कोरोना व्हायरसमुळे जगभरातीला क्रीडा स्पर्धांवर परिणाम होत आहे. आयपीएल 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका रद्द करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे. भारत-आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. 12 तारखेला धर्मशाळा इथं हा सामना होता मात्र पावसामुळे एकही चेंडू न खेळवता सामना रद्द करण्यात आला होता. उर्वरित दोन सामने लखनऊ आणि कोलकाता इथं होणार होते.
India's remaining two ODIs against South Africa in Lucknow and Kolkata called off in wake of COVID-19 pandemic: BCCI official
— Press Trust of India (@PTI_News) March 13, 2020
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालिकेतील उर्वरित दोन सामने रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्याचा निर्णय याआधी बीसीसीआयने घेतला होता. पण आता तो रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते.याआधी इंडियन प्रीमीयर लीगच्या (indian premier league) आयोजनावर कोरोना व्हायरसचं (Corona Virus) संकट उभे राहिलं होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर IPL 2020 ही स्पर्धी पुढे ढकलण्याचा निर्णय BCCI ने घेतला. आता IPL 29 मार्चऐवजी 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे. देशात कोरोना व्हायरस पसरत चालला आहे. यामुळे परराष्ट्र मंत्रालयाने स्पर्धा आयोजित करण्याच्या बाजूने सरकार नसल्याचं म्हटलं होतं. परिणामी आयपीएल 2020 (IPL 2020) लांबणीवर पडली आहे. हे वाचा : 73 वर्षांनी सौराष्ट्रनं जिंकला रणजी करंडक, इतिहास घडवला पण… आयपीएल स्पर्धा 29 मार्चऐवजी 15 एप्रिलपासून सुरु होईल. कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असून स्पर्धा दोन आठवडे पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता आयपीएल 13 व्या सीझनची सुरुवात 15 एप्रिलपासून होणार आहे. 29 मार्च रोजी मुंबईत चैन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यापासून IPL ला सुरुवात होणार होती. हे वाचा : कोरोनाचा भीती तर बघा, सेलिब्रेशन म्हणून क्रिकेटर एकमेकांना मारत आहेत पाय

)








