नवी दिल्ली,13 मार्च: इंडियन प्रीमीयर लीगच्या (indian premier league) आयोजनावर कोरोना व्हायरसचं (Corona Virus) संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर IPL 2020 ही स्पर्धी पुढे ढकलण्याचा निर्णय BCCI ने घेतला आहे. आता IPL 29 मार्चऐवजी 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे.
देशात कोरोना व्हायरस पसरत चालला आहे. यामुळे परराष्ट्र मंत्रालयाने स्पर्धा आयोजित करण्याच्या बाजूने सरकार नसल्याचं म्हटलं होतं. परिणामी आयपीएल 2020 (IPL 2020) लांबणीवर पडली आहे.
संबंधित - कोरोनाची धास्ती! मोदी सरकारच्या प्रतिक्रियेनं IPL चा सस्पेन्स वाढला, काय होणार?
आताच हाती आलेल्या बातमीनुसार 29 मार्चऐवजी 15 एप्रिलपासून इंडियन प्रीमीयर लीगचं आयोजन करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असून स्पर्धा दोन आठवडे पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता आयपीएल 13 व्या सीझनची सुरुवात 15 एप्रिलपासून होणार आहे. दरम्यान, 29 मार्च रोजी मुंबईत चैन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यापासून IPL ला सुरुवात होणार होती.
संबंधित - कोरोनामुळे IPL वर टांगती तलवार, मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय
ईएसपीएनक्रिकइंफोच्या (ESPNcricinfo) रिपोर्टनुसार, भारत सरकारकडून जारी केलेल्या नियमावलीनुसार बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, बोर्ड सचिव जय शाह आणि इंडियन प्रीमियर लीगच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सध्या आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील कोरोना व्हायरसची परिस्थिती 15 एप्रिलपर्यंत आटोक्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विदेशातील क्रिकेटपटूंना व्हिसा दिला जाण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आयपीएल होण्याबाबत तसंच त्याच्या आयोजनाबाबत चर्चा सुरू होती. आता BCCI च्या निर्णयामुळे चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus, Cricket