मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs NZ टी 20 सिरीजमधील दुसऱ्या मॅचवर संकटाचे सावट, मॅच स्थगित करण्याची मागणी

IND vs NZ टी 20 सिरीजमधील दुसऱ्या मॅचवर संकटाचे सावट, मॅच स्थगित करण्याची मागणी

India vs new zealand

India vs new zealand

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs new zealand ) टी 20 सिरीजच्या दुसऱ्या सामन्यावर संकटाचे सावट पसरले आहे.

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड टी 20 सिरीजच्या (India vs New Zealand) दुसऱ्या सामन्यावर संकटाचे सावट पसरले आहे. मॅच सामन्याविरुद्ध झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामना स्थगित किंवा प्रेक्षकांच्या संख्येवर मर्यादा आणावी अशी मागणी करण्यात आली आहे.

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिली टी20 मॅच बुधवारी झाली. देशात कोरोनाची दुसरी लाट येऊन गेल्यानंतरची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच होती. या मॅचमध्ये कोरोनाच्या नियमांचं मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाले. याच पार्श्वभूमिवर झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

झारखंड उच्च न्यायालयाचे अधिवक्ता धीरज कुमार यांनी झारखंड राज्य क्रिकेट संघाच्या जेएससीए स्टेडिअममध्ये न्यूझीलंड आणि भारत यांच्याचा सिरीजमधील खेळवण्यात येणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रवेशावर आक्षेप नोंदवत झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

याचिकेत काय म्हटले आहे?

जेव्हा राज्यातील मंदिर, सर्व कार्यालयांमध्ये कोव्हिड नियमाअंतर्गत 50 टक्के कामगारांना परवानगी देण्यात आली आहे. मग कोणत्या आधारावर राज्य सरकारने स्टेडिअममध्ये 100 टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली आहे. असा सवाल उपस्थित केला आहे.

तसेच होणारी मॅच स्थगित करण्यात यावी, किंवा स्टेडिअममध्ये प्रेक्षकांच्या प्रवेशावर मर्यादा आणाव्यात अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे. यासोबतच याचिकाकर्त्याने लवकरात लवकर सुनावणी करण्यात यावी अशी मागणीदेखील केली आहे.

दोन दिवसांपूर्वी, झालेल्या पहिल्या सामन्यात राज्य सरकारने 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली होती. मात्र, हा निर्णया मागे घेण्यात आला. आयोजकांना सर्व सीट बुक करण्याची परवानगी दिली.

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी 20 सिरीजचा दुसरा सामना शुक्रवारी खेळवण्यात येणार आहे.

न्यूज एजन्सी 'पीटीआय' नं दिलेल्या वृत्तानुसार जयपूरमध्ये आठ वर्षांनी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मॅचबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह होता. मात्र यापैकी अर्ध्याहून अधिक प्रेक्षकांनी मास्क लावला नव्हता. मॅच पाहण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक व्हीआयपी उपस्थित होते, पण त्यांच्या चेहऱ्यावरही मास्क नव्हता. राजस्थान क्रिकेट असोसिएशनं मॅचच्या तिकीटावर मास्क घालणे अनिवार्य असल्याची सूचना केली होती. त्यानंतरही स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या सामान्य प्रेक्षकांपासून ते व्हीआयपीपर्यंत अनेकांनी मास्क घातला नव्हता.

First published:

Tags: New zealand, T20 league, Team india