• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • Fact Check: कोरोना लस घेतल्यानं मैदानात कोसळला एरिक्सन? वाचा Viral मेसेजचं सत्य

Fact Check: कोरोना लस घेतल्यानं मैदानात कोसळला एरिक्सन? वाचा Viral मेसेजचं सत्य

डेन्मार्कचा ख्रिस्टियन एरिक्सन (Christian Eriksen) हा खेळाडू सामन्यादरम्यानच कार्डिॲक अरेस्टमुळे (Cardiac Arrest) मैदानात कोसळला. या सामन्यानंतर एरिक्सनने कोविड-19 लस घेतली होती, असं ट्विट करण्यात आलं होतं.

  • Share this:
नवी दिल्ली 15 जून: फुटबॉल जगतातील मिनी वर्ल्ड कप अशी ओळख असलेल्या युरो कप फुटबॉल स्पर्धा 2020 (Euro Cup 2020) ला सुरुवात झाली असून त्यात रंग भरत आहेत. या स्पर्धेतील डेन्मार्कच्या पहिल्या फिनलंडविरुद्धच्या सामन्यात डेन्मार्कचा मीडफील्डर ख्रिस्टियन एरिक्सन (Christian Eriksen) हा खेळाडू सामन्यादरम्यानच कार्डिॲक अरेस्टमुळे (Cardiac Arrest) मैदानात कोसळला. 12 जूनला झालेल्या या सामन्यानंतर एरिक्सनने कोविड-19 लस घेतली होती, असं ट्विट रेडिओ स्पोर्टिव्हा (Radio Sportiva) या हँडलवरून करण्यात आलं होतं. त्यामुळे कोविड-19 लसीबद्दल अफवा पसरली आणि सोशल मीडियासह मुख्य माध्यमांमध्येही याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली. तात्काळ इंटर मिलान क्लबचे डायरेक्टर ग्युसेपी मारोट्टा (Giuseppe Marotta) यांनी 29 वर्षांच्या एरिक्सन याने कोणतीही लस घेतली नव्हती असे स्पष्टीकरण दिले. त्यांच्या अधिकृत माहितीमुळे लसीसंबंधी सोशल मीडियावर पसरलेली बातमी अफवा असल्याचं स्पष्ट झालं. याच बातमीबद्दल रॉयटर्सने फॅक्ट चेक म्हणजे सत्यता पडताळणारी बातमी प्रसिद्ध केली आहे. 12 जूनला डेन्मार्कविरुद्ध फिनलंड फुटबॉल सामान्यादरम्यान डेन्मार्कचा मीडफील्डर एरिक्सन मैदानात कोसळला तेव्हा सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांसह दोन्ही संघांतील खेळाडूंच्या हृदयाचा ठोकाच चुकला. त्यानंतर त्याला तातडीने कार्डिॲक मसाज देऊन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली की एरिक्सन याने कोविड-19 लसीचा डोस घेतला होता आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून त्याला हृदयविकाराचा झटका आला. ट्विटरवर रेडिओ स्पोर्टिव्हा (Radio Sportiva) या हँडलवरून असं सांगण्यात आलं की एरिक्सनने 31 मेला लसीकरण करून घेतलं होतं. नंतर हे ट्विट डिलिट करण्यात आलं. पण या ट्विटमुळे वाऱ्याच्या वेगानी अफवा पसरली. धक्कादायक! दुखापत झाल्यानंतर फाफ डुप्लेसिसला मेमरी लॉस ‘इंटर मिलानच्या मेडिकल विभागाच्या प्रमुखांनी व हृदयरोगतज्ज्ञांनी इटलीतील रेडिओ स्पोर्टिव्हाशी एक तासापूर्वी बोलताना सांगितलं की एरिक्सनने 12 दिवसांपूर्वी फायझर कंपनीची लस घेतली होती.’अशा ट्विटचे स्क्रीनशॉट इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर टाकण्यात आले होते. राय स्पोर्टशी (Rai Sport) बोलताना इंटर मिलान क्लबचे डायरेक्टर ग्युसेपी मारोट्टा म्हणाले,‘ ही बातमी खरी नाही. त्याला (एरिक्सन) कोविड झाला नव्हता आणि त्याने कोविडची लसही घेतलेली नव्हती. ’ दरम्यान रेडिओ स्पोर्टिव्हानेही एरिक्सनच्या आरोग्याबद्दल कोणतंही ट्विट केल्याचं नाकारलं असून त्यांनी ट्विटरवर लिहिलं,‘ ट्विटमध्ये देण्यात आलेली माहिती खोटी आहे. फुटबॉलपटू ख्रिस्तियन एरिक्सनच्या तब्येतीशी संबंधित इंटर मेडिकल स्टाफचं मत सांगणारी कुठलीही बातमी आम्ही प्रसिद्ध केली नव्हती. त्या ट्विट ऑथरने केलेलं ट्विट कृपया काढून टाका अन्यथा आम्हाला कारवाई करणं भाग पडेल.’ उपाशीपोटी भटकला, ड्रग्जचं व्यसन लागलं.. सचिन-लाराशी भिडणाऱ्या खेळाडूची अवस्था एरिक्सनला कार्डिॲक अरेस्टचा (Cardiac Arrest) त्रास का झाला याचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. तूर्तास वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. 29 वर्षांचा एरिक्सन शुद्धीवर आला असून हॉस्पिटलमध्ये त्याची तब्येत स्थिर असल्याचंही सांगितलं जातंय. निर्णय (VERDICT) असत्य. इंटर मिलानचे डायरेक्टर म्हणाले ख्रिस्तियन एरिक्सनने कोविड-19 लस घेतलेली नाही. त्यामुळे युरो कप 2020 स्पर्धेतील डेन्मार्कच्या आरंभीच्या सामन्यात एरिक्सन मैदानावर कोसळण्याचं कारण लस घेण्याशी संबंधित नाही.
Published by:Kiran Pharate
First published: