धक्कादायक! दुखापत झाल्यानंतर फाफ डुप्लेसिसला मेमरी लॉस

धक्कादायक! दुखापत झाल्यानंतर फाफ डुप्लेसिसला मेमरी लॉस

पाकिस्तान सुपर लीगचा (PSL 2021) यंदाचा मोसम युएईमध्ये होत आहे. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू फाफ डुप्लेसिसला (Faf Du Plessis) गंभीर दुखापत झाली. या दुखापतीनंतर त्याला मेमरी लॉस (Memory Loss) झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 15 जून : पाकिस्तान सुपर लीगचा (PSL 2021) यंदाचा मोसम युएईमध्ये होत आहे. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू फाफ डुप्लेसिसला (Faf Du Plessis) गंभीर दुखापत झाली. या दुखापतीनंतर त्याला मेमरी लॉस (Memory Loss) झाला आहे. खुद्द फाफने याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. तसंच आपण लवकरच मैदानात पुनरागमन करू, असा विश्वासही त्याने वर्तवला आहे. डुप्लेसिस फिल्डिंग करताना बाऊंड्री वाचवण्याच्या नादात क्वेटा ग्लॅडिएटर्समधला (Quetta Gladiators) सहकारी मोहम्मद हसनैनला जाऊन धडकला. या सामन्यात पेशावर जाल्मीकडून क्वेट्टाला 61 रनने पराभवाचा सामना करावा लागला.

ओपनर सॅम अयूब डुप्लेसिसऐवजी कनकशन सबस्टिट्यूट म्हणून आला. दुखापत झाल्यानंतर आता डुप्लेसिसने त्याच्या तब्येतीबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. 'माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. मी ठीक होऊन हॉटेलमध्ये परतलो आहे. दुखापतीसोबतच मला थोडा मेमरी लॉसही झाला आहे, पण मी लवकर बरा होईन आणि मैदानात पुनरागमन करेन,' असं फाफ डुप्लेसिस त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला.

मोहम्मद हसनैनसोबत टक्कर झाल्यानंतर 36 वर्षांचा फाफ डुप्लेसिस जमिनीवर झोपून गेला. ग्लॅडिएटर्सच्या फिजियोने तो उठायच्या आधी त्याच्यावर प्रथमोपचार केले, यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. इनिंगच्या 19 व्या ओव्हरमध्ये डुप्लेसिस बाऊंड्री अडवण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा त्याची आणि हसनैनची टक्कर झाली. यानंतर तो मैदानात आडवा झाला.

ग्लॅडिएटर्सना त्यांच्या याआधीच्या सामन्यातही कनकशन सबस्टिट्यूटचा वापर करावा लागला होता, कारण वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर आंद्रे रसेलच्या हेल्मेटवर मोहम्मद मुसाचा बॉल लागला होता. फिजियोने तपासणी केल्यानंतर रसेलला खेळण्याची परवानगी देण्यात आली पण पुढच्याच बॉलला तो आऊट झाला. यानंतर रसेलला मैदानातूनच स्ट्रेचरवर रुग्णालयात न्यावं लागलं. रसेल नसल्यामुळे क्वेट्टाने त्याच्याऐवजी नसीम शाह याला कनकशन सबस्टिट्यूट म्हणून खेळवलं.

Published by: Shreyas
First published: June 15, 2021, 2:57 PM IST

ताज्या बातम्या