मुंबई, 15 डिसेंबर : ब्राझील फुटबॉल कन्फेडरेशनला 1 कोटी 65 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. मांजराला त्रास दिल्यानं ही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ब्राझीलच्या संघांचे राष्ट्रीय प्रेस अधिकारी विनिसियस रोड्रिगेज यांनी एका मांजराशी क्रूरपणे वागल्यानं एनजीओंच्या एका गटाने आणि देशातील प्राण्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या राष्ट्रीय फोरमने ब्राझील फुटबॉल कन्फेडरेशनविरुद्ध 1 मिलियन रीसचा दावा दाखल केला होता. अर्जेंटिनातील वृत्तपत्र एल ग्राफिकोने बुधवारी दिलेल्या वृत्तानुसार 7 डिसेंबरला रोड्रिगेज यांनी ब्राझील संघासाठी एका पत्रकार परिषदेवेळी मांजराला उचलून टेबलवरून फेकलं होतं. याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल करणाऱ्याने जाहीर माफी आणि पर्यावरण संरक्षण, पशु देखभाल यासाठी सहकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास एका कार्यक्रमाचे आय़ोजन करावे अशी मागणी केलीय. वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये ब्राझीलच्या राष्ट्रीय संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाविरुद्ध पराभूत व्हावं लागलं. यानंतर सोशल मीडियावर अनेक युजर्सनी मांजराला दिलेल्या त्रासामुळे ब्राझीलला असा अपशुकन झाल्याचं म्हटलंय. हेही वाचा : केन विल्यम्सनने कसोटी कर्णधारपद सोडलं, का घेतला निर्णय?
फिफा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये गतविजेत्या फ्रान्सचा अर्जेंटिनाशी सामना होणार आहे. अर्जेंटिनाने क्रोएशियाला हरवून फायनलमध्ये धढक मारली तर फ्रान्सने बुधवारी रात्री झालेल्या सेमीफायनलमध्ये मोराक्कोला 2-0 अशा गोल फरकाने पराभूत केलं. अंतिम सामना 18 डिसेंबरला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडे आठ वाजता होणार आहे.
हेही वाचा : एक-दोन नव्हे 7 रात्री फुटबॉल मॅचेस बघण्यासाठी जागला! तरुणाची झाली अशी भयावह स्थिती फ्रान्सने चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचली आहे. त्यांनी 1998 आणि 2018 मध्ये विजेतेपद पटकावलं होतं. फ्रान्सविरुद्ध सेमीफायनलमध्ये पराभूत झालेल्या मोराक्कोचा १७ डिसेंबरला तिसऱ्या स्थानासाठी क्रोएशियासोबत सामना होणार आहे. 2018 मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावं लागेलल्या क्रोएशियाला यावेळी अर्जेंटिनाविरुद्ध सेमीफायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं.