लंडन, 10 जून : भारताविरुद्ध 18 जून पासून सुरु होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (World Test Championship Final) फायनल जिंकणे हे न्यूझीलंड टीमचे मुख्य ध्येय आहे. त्यासाठी इंग्लंड विरुद्ध गुरुवारी सुरु झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये न्यूझीलंडने सहा बदल केले आहेत. या टेस्टसाठी न्यूझीलंडचा डावखुरा स्पिनर एजाज पटेल (Ajaz Patel) याचा समावेश करण्यात आला आहे. न्यूझीलंडचा मुख्य स्पिनर मिचेल स्टॅनर (Mitchell Santner) दुखापतग्रस्त झाल्याने पटेलला संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे पटेलचा जन्म हा मुंबईत झाला आहे.
मुंबईमध्ये 21 ऑक्टोबर 1988 रोजी जन्मलेला पटेल वयाच्या आठव्या वर्षांपर्यंत भारतामध्येच होता. पण नंतर कुटुंबासोबत न्यूझीलंडला स्थायीक झाला. इंग्लंड विरुद्धच्या टेस्टमधील त्याची कामगिरी आणि सँटरनरची दुखापत या दोन गोष्टीच्या आधारे त्याचा भारताविरुद्धची फायनल खेळण्यासाठी अंतिम 11 मध्ये निवड होण्याची शक्यता आहे.
या सामन्यात आपल्याच देशाच्या खेळाडूंविरुद्ध खेळणं कठीण जाईल, अशी प्रतिक्रिया एजाज पटेलने दिली आहे. एजाज पटेलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तो ज्या देशात जन्म झाला त्यांच्याचविरुद्ध खेळणं सोपं जाणार नाही, पण हा अनुभव वेगळा असेल. आयुष्यभर हे लक्षात राहिल, असं म्हणाला आहे.
एजाज पटेलने 2018 साली टेस्टमध्ये पदार्पण केलं होतं, पाकिस्तानविरुद्धच्या त्या सामन्यात एजाजने 7 विकेट घेतल्या आणि न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. एजाज पटेल आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये मॅन ऑफ द मॅच होता. आतापर्यंत खेळलेल्या 8 टेस्टमध्ये त्याने एकूण 22 विकेट घेतल्या आहेत. एजाजची इंग्लंडविरुद्धची दोन टेस्ट मॅचची सीरिज आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी न्यूझीलंडच्या टीममध्ये निवड झाली आहे.
WTC Final: विराटच्या लाडक्या खेळाडूच्या समावेशासाठी टीम इंडियाची खास योजना
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणारी फायनल लक्षात घेत न्यूझीलंडने त्यांच्या टीममध्ये 6 बदल केले आहेत. या टीममध्ये विली यंग, टॉम ब्लंडेल, डॅरेल मिचेल, हेन्री निकोलस आणि ट्रेंट बोल्ट या पाच जणांचा एजाज पटेलसह समावेश करण्यात आलाय. न्यूझीलंडचा नियमित कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) दुखापतीमुळे या टेस्टमधून आऊट झालाय. त्यामुळे टॉम लॅथम कॅप्टनसी करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, England, New zealand, Team india