मुंबई, 10 जून: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी (WTC Final) आता आठ दिवसांचाच कालावधी उरला आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी या फायनलसाठी ग्रुप प्रॅक्टीस सुरु केली आहे. तीन ते चार खेळाडूंच्या गटामध्ये भारतीय खेळाडू सध्या प्रॅक्टीस करत आहेत. सॉफ्ट क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू एकत्र सराव करतील. त्यावेळी अंतिम 11 मध्ये कोण खेळणार? याचा निर्णय घेतला जाईल.
साऊथम्पटनमध्ये होणाऱ्या फायनलमध्ये विराट कोहली टॉससाठी मैदानात उतरेल त्यावेळी मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) अंतिम 11 मध्ये असावा असा टीम इंडियाचा प्रयत्न आहे. सिराजने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाच्या टेस्ट टीममध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो सातत्याने चांगली बॉलिंग करत आहे. मात्र त्याची टीममध्ये निवड होणे इतके सोपे नाही
प्रमुख बॉलर्सशी सिराजची स्पर्धा
वेस्ट इंडिजमध्ये 2019 मध्ये झालेल्या सीरिजनंतर पहिल्यांदाॉच जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) हे टीम इंडियाचे तीन्ही प्रमुख फास्ट बॉलर फिट आहे. भारतीय क्रिकेट टीमच्या गेल्या तीन वर्षांमधील यशामध्ये या तिघांचा मोठा वाटा आहे.
सिराजची अंतिम 11 मधील समावेशासाठी अनुभवी इशांत शर्माशी स्पर्धा आहे. सातत्याने बॉलिंग करण्याची क्षमता हे इशांतचे मुख्य कौशल्य आहे. पण वाढते वय आणि दुखापती यामुळे त्याला मर्यादा आल्या आहेत. त्यातच सिराजने ट्रेनिंग सेशनमध्ये टीम मॅनेजमेंटला प्रभावित केले आहे. न्यूझीलंडच्या बॅटिंग ऑर्डरचा विचार करता सातत्याने बाऊन्सर टाकणारा सिराज उपयुक्त ठरेल असा मॅनेजमेंटला विश्वास आहे.
मेरी कोमच्या रोल मॉडेल बॉक्सरचे वयाच्या 42 व्या वर्षी निधन, आशियाई स्पर्धेत जिंकले होते गोल्ड
तर दुसरिकडे इशांत शर्माकडे इंग्लंडमधील 12 टेस्टसह 101 टेस्टचा अनुभव आहे. या अनुभवाकडे दुर्लक्ष करणे मॅनेजमेंटसाठी अवघड आहे. टीम इंडियाचे संतुलन ठेवण्यासाठी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि आर. अश्विन (R. Ashwin) या दोन्ही स्पिनर्सचा समावेश होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. मात्र साऊथम्पटनमधील हवामान आणि खेळपट्टी याचा विचार करुन 4 फास्ट बॉलर्स अंतिम 11 मध्ये खेळवण्याच्या पर्यायाचाही टीम इंडिया विचार करत आहे. त्या परिस्थितीमध्ये जडेजा किंवा अश्विन यापैकी एकाच्या जागेवर सिराजचा टीममध्ये समावेश होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, New zealand, Team india, Virat kohli