मुंबई, 20 सप्टेंबर: ऑस्ट्रेलियातल्या आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी 16 संघ मैदानात उतरणार आहेत. महिनाभर चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 45 सामने खेळवले जाणार आहेत. त्यासाठी सर्व संघांचा कसून सराव सुरु आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हे सर्व संघ ऑस्ट्रेलियात दाखल होतील. त्यापैकीच एक आहे आयर्लंड. पण यावेळी वर्ल्ड कपमध्ये खेळताना आयर्लंडच्या जर्सीवर एका भारतीय कंपनीचं नाव झळकणार आहे. ही कंपनी यंदाच्या टी20 वर्ल्ड कपसाठी आयर्लंडची अधिकृत प्रायोजक असणार आहे.
‘अमूल’ आयर्लंडचे ऑफिशियल स्पॉन्सर
भारतातली सर्वात मोठी दूध उत्पादक कंपनी ‘अमूल’ ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी आयर्लंडची ऑफिशियल स्पॉन्सर असेल. ‘अमूल’नं आयर्लंड क्रिकेट बोर्डाशी तसा करार केला आहे. त्यामुळे आयर्लंड खेळाडूंच्या जर्सीवर आता ‘अमूल’चा लोगो ठळकपणे दिसणार आहे.
भारतीय कंपनी अमूल ही डेअरी उत्पादक कंपन्यांमध्ये जगातली नववी सर्वात मोठी कंपनी आहे. तर भारतातली सर्वात मोठी फूड कंपनी आहे. याआधी अमूलनं 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकन संघाची स्पॉन्सरशिप घेतली होती. तर त्याआधी अमूल न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान संघाचेही ऑफिशियल स्पॉन्सर राहिले आहेत.
👉 WELCOME TO AMUL@Amul_Coop has been revealed as the Ireland Men’s Official Team Sponsor for the @T20WorldCup.
Welcome aboard to the team from Amul - thanks for your support of Irish cricket. ➡️ Read more: https://t.co/YAxcevZcQW#BackingGreen #Amul ☘️🏏 pic.twitter.com/FxlAITdmHK — Cricket Ireland (@cricketireland) September 20, 2022
हेही वाचा - ICC Cricket Law: क्रिकेटमध्ये आता ‘मंकडिंग’ नाही तर 'रन आऊट', पाहा 1 ऑक्टोबरपासून ICC लागू करणार हे नवे नियम
आयर्लंडची वर्ल्ड कप मोहिम 17 ऑक्टोबरपासून
टी20 वर्ल्ड कपसाठी आयर्लंडचा संघ अ गटात आहे. या गटात आयर्लंडसह वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि स्कॉलंडचा समावेश आहे. 17 ऑक्टोबरला आयर्लंडचा पहिला सामना झिम्बाब्वेशी होणार आहे. या गटातून अव्वल दोन संघ ग्रुप 1 मध्ये प्रवेश करतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sports, T20 cricket, T20 world cup 2022