मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ICC Cricket Law: क्रिकेटमध्ये आता ‘मंकडिंग’ नाही तर 'रन आऊट', पाहा 1 ऑक्टोबरपासून ICC लागू करणार हे नवे नियम

ICC Cricket Law: क्रिकेटमध्ये आता ‘मंकडिंग’ नाही तर 'रन आऊट', पाहा 1 ऑक्टोबरपासून ICC लागू करणार हे नवे नियम

मंकडिंगच्या नियमात मोठा बदल

मंकडिंगच्या नियमात मोठा बदल

येत्या एक ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या प्लेईंग कन्डिशन्समध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. त्यात सर्वाधिक वादग्रस्त ठरणाऱ्या मंकडिंग विकेटच्या नियमातही मोठा बदल केला आहे.

  • Published by:  Siddhesh Kanase
मुंबई, 20 सप्टेंबर: येत्या एक ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या अनेक नियमात मोठे बदल केले जाणार आहेत. जागतिक क्रिकेटवर नियंत्रण ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती अर्थात आयसीसीनं या बदलांची नुकतीच घोषणा केली आहे. सौरव गांगुलीच्या अध्यक्षतेखालील आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीनं त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून प्लेईंग कन्डिशन्समधले हे बदल लागू केले जाणार आहेत. त्यात सर्वाधिक वादग्रस्त ठरणाऱ्या मंकडिंग विकेटच्या नियमातही मोठा बदल केला आहे. 1 ऑक्टोबरपासून क्रिकेटमध्ये बदललेले 8 नियम 1 – कॅच आऊट नंतर नवा बॅट्समन स्ट्राईकवर क्रिकेटच्या जुन्या नियमानुसार एखादा बॅट्समन कॅच आऊट झाला आणि त्यादरम्यान धाव घेताना दोन्ही बॅट्समन एकमेकांना क्रॉस झाल्यास नॉन स्ट्राईकर पुढचा बॉल खेळायचा. पण आता नव्या नियमानुसार जरी दोघे बॅट्समन क्रॉस झाले असतील तरी आऊट झालेल्या बॅट्समनच्या जागी येणारा नवा बॅट्समनच स्ट्राईकवर खेळणार आहे. 2 – बॉल शाईन करण्यासाठी लाळेचा वापर नाही कोरोनामुळे आयसीसीनं दोन वर्षांपूर्वीच बॉल शाईन करण्यासाठी अर्थात चेंडूला लकाकी आणण्यासाठी थुंकी किंवा लाळ वापरण्यावर तात्पुरते निर्बंध घातले होते. पण क्रिकेट नियम बनवणाऱ्या आणि त्यात बदल करणाऱ्याचा अधिकार असणाऱ्या मेरिलिबोन क्रिकेट क्लबनं (MCC) मार्च 2022 मध्ये यावर पूर्णपणे निर्बंध घातले आहेत. 3 – मंकडिंगनाही तर रन आऊट यापुढे बॉलक बॉलिंग करताना बॉल टाकायच्या आत नॉन स्ट्रायकर एन्डच्या बॅट्समननं जर क्रीझ सोडली तर ते नियमबाह्य मानण्यात येईल. अशा वेळी जर बॉलरनं बेल्स उडवल्यास बॅट्समनला आऊट दिलं जाईल. पण आता अशा विकेटला ‘मंकडिंग’ म्हटलं जाणार नाही. तर बॅट्समनला ‘रन आऊट’ दिलं जाईल. याआधी अशा विकेटवरुन मोठा वाद झाल्याचं अनेकदा पाहायला मिळालं. पण आता याला नियमाच्या चौकटीत बसवण्यात आलं आहे. 4 – फिल्डिंगवेळी अनुचित प्रकार बॉलर रन अपवर असताना फिल्डिंग करणाऱ्या टीमपैकी कोणत्याही खेळाडूनं अनुचित प्रकारचं वर्तन केलं किंवा स्लेजिंग केलं तर अम्पायर ‘डेड बॉल’ची घोषणा करतील. आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला 5 पेनल्टी धावा दिल्या जातील. 5 – नव्या बॅट्समनला मैदानात येण्यासाठी 2 मिनिटांचा वेळ कसोटी आणि वन डे क्रिकेटमध्ये आता एखादा बॅट्समन आऊट झाल्यानंतर नवा बॅट्समन मैदानात येण्यासाठी आता तीनऐवजी दोन मिनिटांचाच वेळ दिला जाईल. टी20त मात्र 90 सेकंदाचा नियम कायम राहिल 6 – वन डेतही स्लो ओव्हर रेटसाठी दंड आयसीसीनं आणखी एक मोठा निर्णय घेतलाय तो स्लो ओव्हर रेटच्या बाबतीत. टी20त स्लो ओव्हर रेटसाठी फिल्डिंग करणाऱ्या टीमला पेनल्टी म्हणून राहिलेल्या ओव्हरमध्ये 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाचऐवजी चारच फिल्डर ठेवण्याची मुभा आहे. आता तोच नियम वन डेतही लागू होणार आहे. 2023 च्या वर्ल्ड कपनंतर या नियमाची अंमलबजावणी होईल. हेही वाचा - Roger Federer: बापरे! फेडररच्या शेवटच्या मॅचचं तिकिट हवंय? मग मोजावे लागतील इतके लाख रुपये...
7 – पीचच्या आतच शॉट खेळण्याचा नियम या नव्या नियमानुसार आता कोणत्याही बॉलवर पीचच्या आतच राहून बॅट्समनला खेळावं लागणार आहे. काही वेळा बॉलरच्या हातून बॉल सुटून तो पीचच्या बाहेर गेल्यास बॅट्समन धावत जाऊन फटका खेळत असे. पण आता तसं केल्यास अम्पायर डेड बॉल घोषित करतील. 8 – हायब्रिड पीचचा वापर सध्याच्या काळात अनेक देशात क्रिकेट खेळताना हायब्रिड पीचचा वापर केला जातो. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ महिला क्रिकेट सामन्यांसाठीच अशा पीचचा वापर केला गेला आहे. पण यापुढच्या काळात पुरुषांच्या क्रिकेटमध्येही अशा खेळपट्ट्या तयार केल्या जातील.
First published:

Tags: Cricket, Cricket news, Icc, Sports

पुढील बातम्या