सिडनी, 17 जानेवारी : अफगाणिस्तानचा माजी कर्णधार रशीद खान (Rashid Khan) प्रत्येक वेळी मैदानावर पाऊल टाकताना आपली एक वेगळी उर्जा घेऊन येतो. गोलंदाजी असो, फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण रशिद खान प्रत्येक विभागात सातत्याने चांगली कामगिरी करत असतो. रशीद सध्या बिग बॅश लीगमधील ॲडलेड स्ट्रायकर संघाकडून खेळत होता. नुकत्याच एका सामन्यात ब्रिस्बेन हीटविरुद्ध रशीदनं एक अप्रतिम कॅच घेतला. रशीद खानच्या या झेलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा कॅच पाहून चाहत्यांना 1983च्या वर्ल्ड कप दरम्यान कपिल देव यांनी विव्हियन रिचर्ड्स यांचा एक अविस्मरणीय झेल घेतला होता. रशीदनं ॲडलेड स्ट्रायकर विरुद्ध ब्रिस्बेन हीट यांच्यात झालेल्या एक जबरदस्त कॅच घेतला. वाचा- साराच्या समोर कार्तिकनं सांगितला त्याचा Valentine प्लान, अशी असेल ‘डेट नाइट’ ॲडलेड स्ट्रायकरच्या गोलंदाजांनी या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. त्यामुळं ब्रिस्बेन हीटया संघ 17 षटकांत केवळ 100 धावांवर बाद झाला. संघासाठी, लियाम ओ’कॉनरने सर्वाधिक 3 तर मायकेल नासर आणि वेस एगरने प्रत्येकी 2 गडी बाद केले. यादरम्यान टीमचा कर्णधार ख्रिस लिनचा रशीद खानने शानदार झेल टिपला. या कॅचमुळे ख्रिस लिन केवळ 26 धावांवर बाद झाला. वाचा- धक्कादायक! पराभव झाला नाही सहन, अन् क्रिकेटपटूनं मैदानातच सोडला जीव रशीदन घेतला सर्वात कठिण कॅच खरं तर, ख्रिस लिन आठव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर लियाम ओ’कॉनरच्या गोलंदाजीवर मिड विकेटला शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा शॉट कव्हरमध्ये गेला. दरम्यान, अशा परिस्थितीत चेंडू रशीद खानच्या पुढे जाईल असे वाटत असताना, राशिदने मागच्या बाजूला धावण्यास सुरवात केली आणि शेवटपर्यंत बॉलवर लक्ष ठेवले. जेव्हा बॉल जमिनीवर पडणार होता, तेव्हा रशीद खानने झेल टिपण्यासाठी डाईव्ह लगावला आणि झेलही पकडला. वाचा- निक जोनसचं नवं गाणं रिलीज, फक्त शर्ट घालून BOLD डान्स करताना दिसली प्रियांका
Rashid Khan can do anything! We repeat, Rashid Khan can do anything!! 🤯🤯#BBL09 #OrangeArmy @rashidkhan_19pic.twitter.com/SlihwBwXyb
— SunRisers Hyderabad (@SunRisers) January 17, 2020
वाचा- 3 सेकंदात घराचा चुराडा! स्फोटकं लावून उद्ध्वस्त केली इमारत, पाहा थरारक VIDEO बिग बॅश लीगमध्ये रशीद खानची शानदार कामगिरी 21 वर्षीय अफगाणिस्तानचा खेळाडू रशीद खाननं बिग बॅश लीगमध्ये आतापर्यंत विलक्षण कामगिरी केलीआहे. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 15 विकेट आहेत. या सामन्यातही राशिद खानने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने त्याच्या चार षटकांत केवळ 15 धावा देऊन एक बळी घेतला. त्याने 3.75च्या सरासरीनं धावा दिल्या.

)







