मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

साराच्या समोर कार्तिकनं सांगितला त्याचा Valentine प्लान, अशी असेल 'डेट नाइट'

साराच्या समोर कार्तिकनं सांगितला त्याचा Valentine प्लान, अशी असेल 'डेट नाइट'

‘लव्ह आज कल’ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान साराच्या समोरच कार्तिकनं त्याच्या व्हेलेंटाइन डेचा प्लान शेअर सुद्धा केला आहे.

‘लव्ह आज कल’ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान साराच्या समोरच कार्तिकनं त्याच्या व्हेलेंटाइन डेचा प्लान शेअर सुद्धा केला आहे.

‘लव्ह आज कल’ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान साराच्या समोरच कार्तिकनं त्याच्या व्हेलेंटाइन डेचा प्लान शेअर सुद्धा केला आहे.

    मुंबई, 17 जानेवारी : कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्या बहुचर्चित ‘लव्ह आज कल’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. हा सिनेमा येत्या फेब्रुवारीमध्ये व्हेलेंटाइन डेला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण त्याआधी सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान सारा आणि कार्तिकनं या सिनेमाशी संबंधित सर्वच प्रश्नांची उत्तर दिली आणि यासोबतच साराच्या समोरच कार्तिकनं त्याच्या व्हेलेंटाइन डेचा प्लान शेअर सुद्धा केला आहे. यासोबतच त्याची डेट नाइट कशी असेल याबद्दलचा खुलासाही त्यांनी केला. सारानं करण जोहरच्या चॅट शोमध्ये कार्तिकला डेट करायची इच्छा बोलून दाखवल्यानंतर अभिनेता रणवीर सिंहने एका इव्हेंटमध्ये या दोघांची भेट घडवून आणली होती. त्यानंतर या जोडीची लोकप्रियता लक्षात घेता इम्तियाज अली यांनी ‘लव्ह आज कल 2’साठी साइन केलं आणि यांच्यातील जवळीक वाढलेली दिसून आली. पण दरम्यानच्या काळात या दोघांचं ब्रेकअप झाल्याचंही समोर आलं आहे. पण तरीही आता सिनेमाच्या प्रमोशनसाठी हे दोघंही मतभेद विसरुन एकत्र आले आहेत. ट्रेलर लॉन्चच्या वेळी कार्तिकला जेव्हा त्याचा व्हेलेंटाइन डेचा प्लान विचारण्यात आला. तेव्हा कार्तिकच्या आधी या प्रश्नाचं उत्तर सारानं दिलं. सारा म्हणाली उत्तर इथे आहे, लव्ह आज कल पाहणार आहे अजून काय करणार. हा प्रश्न कार्तिकला पुन्हा एकदा विचारण्यात आल्यावर सारानं त्याला तोडत मध्येच म्हटलं, तो येणार नाही का? त्याला तुम्ही असं का विचारत आहात. त्यानंतर कार्तिककडे वळून त्याला विचारते, नाही येणार का तू? त्यावर कार्तिक म्हणतो, एकत्र? आपण दोघं डेटवर जाणार का? यावर सारा म्हणते. आपला सिनेमा आहे. माझ्यासोबत नाही तर कोणासोबत जाणार. त्यांच्या या संभाषणावर सर्व हसू लागतात. यानंतर कार्तिकनं सांगितलं, हो आम्ही दोघंही सिनेमा पाहायला जाणार आहोत त्या रात्री आणि त्याच्या आदल्या रात्री सुद्धा. ही आमची डेट नाइट असेल. इम्तियाज अली यांचं दिग्दर्शन असलेला ‘लव्ह आज कल 2’ हा सिनेमा 2009 मध्ये सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘लव्ह आज कल’चा सिक्वेल आहे. फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर सारा आणि कार्तिकचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood, Kartik aryan, Sara ali khan

    पुढील बातम्या