इंदूर, 17 जानेवारी : बेकायदा बांधकाम केलेल्या इमारती पाडण्याच्या मोहिमेत शुक्रवारी इंदूर महानगरपालिकेने चार मजली इमारत उद्ध्वस्त केली. आयएमसीच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, न्याय नगर विस्तारात बांधलेल्या इमारतीच्या मालकास 15 जानेवारी रोजी नोटीस बजावण्यात आली होती आणि हे अवैध बांधकाम दोन दिवसात हटवण्यास सांगितले. मात्र हे बेकायदेशीर बांधकाम हटवण्यात न आल्यामुळं पालिकेला नाईलाजानं स्फोटके लावून ही इमारत उद्ध्वस्त करावी लागली. स्फोटक इतके शक्तिशाली होते की स्फोटानंतर काही सेकंदातच ही चार मजली इमारत पत्त्यांप्रमाणे कोसळली. वाचा- रोहित पवार जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट फोन लावतात… वाचा- आई म्हणाली होती राजकारणात जाऊ नकोस - आदित्य ठाकरे
#WATCH Madhya Pradesh: Indore administration demolished a three-storied illegal building through a controlled implosion today. pic.twitter.com/7HT2OxAJcW
— ANI (@ANI) January 17, 2020
वाचा- लग्न सराईत आली हटके ऑफर! पत्नीनेच पतीचे दुसरे लग्न लावून दिल्यास रिसेप्शन FREE वाचा- रानु मंडलच्या गाण्याचा ‘इमानदार’ चाहता, सोशल मीडियावर VIDEO VIRAL दरम्यान, ही जमीनदोस्त केलेली इमारत बेकायदेशीरपणे सरकारी जमीन ताब्यात घेऊन बांधली असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. याआधी कोची समुद्र किनाऱ्यावर उभाऱण्यात आलेल्या सर्व अनधिकृत बांधकामांना पाडण्याचे काम करण्यात आले होते.

)







