निक जोनसचं नवं गाणं रिलीज, फक्त शर्ट घालून BOLD डान्स करताना दिसली प्रियांका

निक जोनसचं नवं गाणं रिलीज, फक्त शर्ट घालून BOLD डान्स करताना दिसली प्रियांका

निक जोनस याचं नवं गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात निक-प्रियांकाचा बोल्ड लुक पाहायला मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 17 जानेवारी : अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनस याचं नवं गाणं रिलीज झालं आहे. मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत असलेलं What A Man Gotta Do नुकतंच रिलीज झालं. या गाण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. कारण हे गाणं निक आणि प्रियांकावर चित्रीत करण्यात आलं आहे. प्रियांकानं या गाण्याचे काही फोटो सुद्धा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. त्यानंतर आता रिलीज झालेलं हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. या गाण्यात प्रियांका निकचा खूपच बोल्ड लुक पाहायला मिळत आहे.

What A Man Gotta Do या गाण्याच्या सुरुवातीलाच निक फक्त शर्ट घालून डान्स करताना दिसत आहे. या पूर्ण गाण्यात तो प्रियांकाला इम्प्रेस करताना दिसत आहे. याशिवाय या गाण्यात निकचे भाऊ जो जोनस आणि केविन जोनस सुद्धा त्यांच्या पत्नींसोबत दिसत आहे. या तिघांची केमिस्ट्री खूप पसंत केली जात आहे.

लग्नाआधीच प्रेग्नन्ट आहे कल्कि, अभिनेत्रीनं सांगितली काय होती आईची प्रतिक्रिया

गाण्याच्या सुरुवातीला एकिकडे निक जोनस फक्त शर्ट घालून नाचताना दिसत आहे तर दुसरीकडे गाण्याच्या शेवटी प्रियांका सुद्धा फक्त शर्ट घालून डान्स करताना दिसत आहे. या गाण्यावर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये जोनस ब्रदर्सनी त्यांच्या पुढच्या गाण्यातही मॉडेल्सच्या बदल्यात त्यांच्या पत्नींनाच घ्यावं असा सल्ला दिला आहे.

निक जोनसचा ‘तो’ HOT व्हिडीओ पाहून प्रियांकानं घेतला होता लग्नाचा निर्णय!

 

View this post on Instagram

 

I’m risky... he’s the business @nickjonas @jonasbrothers Coming soon. 1.17.20 pre order!! #WhatAManGottaDoVideo

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

याअगोदर जोनस ब्रदर्सचं Sucker हे गाणं रिलीज झालं होतं. ज्यात हे भाऊ त्यांच्या बायकांसोबत दिसले होते. त्यांच्या या गाण्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर ‘सकर’ गाण्याचं यश पाहून जोनस ब्रदर्सनी पुन्हा एकदा त्यांच्या पत्नींना आपल्या गाणाच्या व्हिडीओमध्ये घेतलं.

माजी मिस इंडिया वर्ल्डला अश्लील फोटोंवर टॅग करत होता भामटा, FIR दाखल

First published: January 17, 2020, 3:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading