दुबई, 11 ऑक्टोबर: चेन्नई सुपर किंग्सनं दिल्ली कॅपिटल्सचा (CSK vs DC) 4 विकेट्सनं पराभव करत आयपीएल स्पर्धेच्या फायनलमध्ये (IPL 2021 Final) प्रवेश केला आहे. या विजयात युवा खेळाडू ऋतुराज गायकवाडचा मोलाचा वाटा आहे. दरम्यान, ऋतुराजच्या चांगल्या फार्ममुळे अभिनेत्री सायली संजीव चांगलीच चर्चेत आली आहे. ‘आज तुमचे हे चांगले खेळले’ अशा कमेंट्स सायलीच्या एका फोटोवर सध्या पडत आहेत. सामन्यादरम्यान, सायलीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ती तिच्या न्यू इयररिंग्स आपल्या चाहत्यांना दाखवत आहे. पण चाहत्यांना तिला पाहून दुबईत खेळत असणारा धडाकेबाज ऋतुराज आठवला.
चाहत्यांनी तिच्या कमेंट्स बॉक्समध्ये ऋतुराजच्या खेळीवरुन अनेक कमेंट्स केल्या आहेत. न्यू इयररिंग्स पाहता एका चाहत्याने थेट ऋतुराजने दिल्या आहेत का? असा सवाल केला आहे. तर चेन्नईच्या विजयानंतर ‘आज तुमचे हे चांगले खेळले’ अशी कमेंट केली आहे. तसेच एका चाहत्याने ऋतु का राज असे म्हटले आहे. तर, दुकऱ्या एका चाहत्याने ‘‘सायली दीदीला ऋतुराज आवडत असेल खूप ऋतुराज 👏👏👏👏 चांगला खेळला भावा तू 👏👏👏 आणि एकदा सायली ला भेटून घे मन शांत होईल सायली दीदी च’’ असे म्हटले आहे.
या अशा कमेंट्समुळे सायली संजीव आणि ऋतुराजच्या अफेअरची चर्चा जोरदार रंगली आहे. चेन्नईकडून खेळणारा ऋतुराज गायकवाड सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. काल दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून चेन्नई सुपर किंग्सने विक्रमी 9 व्या वेळी अंतिम फेरी गाठली आहे. या सामन्यात ऋतुराजने 50 चेंडूत 70 धावा केल्या. ऋतुराजने विजयी खेळीदरम्यान हंगामात 600 धावांचा टप्पाही ओलांडला. इतकेच नव्हे तर ऋतुराजला मॅन ऑफ द मॅच पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.