जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Cricket: नशीब म्हणतात ते याला... डायरेक्ट हिट, बॅट्समन क्रीझबाहेर तरीही अम्पायरनं दिलं नॉट आऊट; पाहा Video

Cricket: नशीब म्हणतात ते याला... डायरेक्ट हिट, बॅट्समन क्रीझबाहेर तरीही अम्पायरनं दिलं नॉट आऊट; पाहा Video

अभिमन्यू ईश्वरन ठरला नशीबवान

अभिमन्यू ईश्वरन ठरला नशीबवान

Cricket: यशस्वी जैसवाल आणि अभिमन्यू ईश्वरनच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतानं पहिल्या दिवसअखेर बिनबाद 120 धावांची मजल मारली आहे. पण भारताच्या या डावादरम्यान अभिमन्यू ईश्वरनला नशीबाची चांगलीच साथ मिळाली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

कॉक्स बाजार-बांगलादेश, 29 नोव्हेंबर: भारताचा अ संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. याच दौऱ्यातल्या पहिल्या चार दिवसीय कसोटी सामन्याला आज सुरुवात झाली. भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 112 धावात आटोपला. त्यानंतर यशस्वी जैसवाल आणि अभिमन्यू ईश्वरनच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतानं पहिल्या दिवसअखेर बिनबाद 120 धावांची मजल मारली आहे. पण भारताच्या या डावादरम्यान अभिमन्यू ईश्वरनला नशीबाची चांगलीच साथ मिळाली. होता रन आऊट, पण दिला नॉट आऊट भारताच्या डावाची मुंबईकर यशस्वी जैसवाल आणि तामिळनाडूच्या अभिमन्यू ईश्वरननं चांगलीच सुरुवात केली. या दोघांनीही दिवसअखेर आपापली अर्धशतकही झळकावली. त्यामुळे भारताला पहिल्याच दिवशी आघाडी घेता आली. पण यादरम्यान अभिमन्यू ईश्वरन नशीबवान ठरला. 9 धावांवर असताना एक चोरटी धाव घेण्याच्या नादात ईश्वरन आऊट होता होता वाचला. ईश्वरननं मिडऑनला फटका खेळून धाव घेतली पण फिल्डरनं डायरेक्ट हिट मारला आणि रन आऊटसाठी अपील केली. पण अम्पायरनी ईश्वरनला नॉट आऊट दिलं. पण रिप्लेमध्ये तो आऊट असल्याचं स्पष्ट दिसत होतं.

जाहिरात

हेही वाचा -  Vijay Hajare Trophy: कोण आहे तो बॉलर ज्याला ऋतुराजनं ठोकले 7 सिक्स? ‘या’ खास अ‍ॅक्शनमुळे झाली होती चर्चा… सौरभ कुमारचा भेदक मारा दरम्यान डावखुरा फिरकी गोलंदाज सौरभ कुमार आणि वेगवान गोलंदाज नवदीप सैनिच्या प्रभावी आक्रमणासमोर बांगलादेशचा डाव पहिल्याच दिवशी 112 धावात आटोपला. सौरभ कुमारनं 4 तर सैनीनं 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय मुकेश कुमारनं 2 तर अतित सेठनं 1 विकेट घेतली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जैसवाल 61 तर ईश्वरन 53 धावांवर खेळत होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात