नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : भारतीय संघात सध्या एक-एक खेळाडू लग्नबंधनात अडकत आहे. तर, काही खेळाडू अजूनही टीम इंडियात बॅचलर आहे. अशाच खेळाडूंसाठी सध्या मुलगी शोधण्याचे काम भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग करत आहे. याबाबतच त्याने ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे. हरभजन सिंगची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हरभजन सिंग ज्या खेळाडूसाठी मुलगी शोधत आहे तो खेळाडू आहे भारताला लेग स्पिनर अमित मिश्रा. अमित मिश्राला 3 वर्षात भारतीय संघात खेळण्याची संधी मिळालेली नाही. 2016मध्ये अमित मिश्रांने शेवटचा सामना खेळला होता. आज 24 नोव्हेंबरला अमित मिश्रानं 37व्या वर्षात पदार्पण केले. त्यामुळं ट्विटरवरून त्याला सर्व दिग्गज खेळाडूंकडून शुभेच्छा मिळत असताना, हरभजन सिंगनं मात्र एक भलतीच गुगली टाकली आहे. अमित मिश्रा 16 वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे. त्यानं 2003मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये तर 2008मध्ये कसोटीमध्ये पदार्पण केले. मिश्राने भारताकडून 22 कसोटी, 36 एकदिवसीय सामने खेळले आहेत. दरम्यान मिश्राच्या वाढदिवसानिमित्त हरभजन सिंगने सोशल मीडियावर, “वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला. देव तुला नेहमी आनंदी आणि निरोगी ठेवो. या वर्षी तरी तुझं लग्न होऊ दे, यासाठी मी प्रार्थना करेन. कोणती चांगली घरेलू मुलगी असेल तर सांगा, मित्राचे लग्न करायचे आहे”, अशी मजेशीर पोस्ट लिहिली.
Happy birthday @MishiAmit god bless you.. is Sal Teri Shadi ho jaye yehi Dua hai.. koi achi garelu ladki ho tho batana bhai ki shadi karwani hai dosto 🤗😜
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) November 25, 2019
हरभजन सिंगच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर मिम्सनं धुमाकूळ घातला आहे. काही मुलींनी तर आपला फोटोही टाकला आहे. तर काहींनी चांगली मुलगी असेल तर हरभजन सिंगला संपर्क करा, असे लिहिले आहे. 24 नोव्हेंबर 1983मध्ये दिल्लीत जन्म झालेल्या अमित मिश्रानं आयपीएलमध्ये पहिल्या हंगामापासून दमदार खेळी केली आहे. त्यानं डेक्कन चार्जर्स, दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून खेळला आहे. ऐवढेच नाही तर आयपीएलमध्ये हॅट्रिक घेण्याची कामगिरीही त्यानं केली आहे. अमित मिश्राची कारकिर्द लेग स्पिनर अमित मिश्रानं टीम इंडियाकडून 22 कसोटी सामन्यात 76 विकेट घेतल्या आहेत. यात 71 धावा गेत 5 विकेट ही त्याची सर्वेश्रेष्ठ खेळी राहिली आहे. याशिवाय त्यानं 36 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात 64 विकेट घेतल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 48 धावा देत 6 विकेट घेतल्या आहेत. तर, 10 टी-20 सामन्यात 16 विकेट घेतल्या आहेत.

)







