जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Eng vs Pak Final: पाकिस्तानच्या कॅप्टनचा लाजीरवाणा कारनामा, पाहा वर्ल्ड कपमध्ये काय केलं?

Eng vs Pak Final: पाकिस्तानच्या कॅप्टनचा लाजीरवाणा कारनामा, पाहा वर्ल्ड कपमध्ये काय केलं?

बाबर आझमचा फ्लॉप शो

बाबर आझमचा फ्लॉप शो

Eng vs Pak Final: फायनलसह सातही मॅचमध्ये पाकिस्तानच्या कॅप्टनला मात्र फार मोठी कामगिरी करता आली नाही. अपवाद सेमी फायनलच्या सामन्याचा. पण तरीही बाबर आझमच्या नावावर या वर्ल्ड कपमध्ये लाजीरवाण्या कामगिरीचा शिक्का बसला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मेलबर्न, 13 नोव्हेंबर: पाकिस्तानचा संघ यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सुपर 12 फेरीतूनच बाहेर पडण्याच्या मार्गावर होता. पण नेदरलँडनं दक्षिण आफ्रिकेला धक्का दिला आणि पाकिस्तानचं सेमी फायनलचं तिकीट पक्क झालं. त्यानंतर पाकनं न्यूझीलंडला हरवून फायनलही गाठली. पण फायनलसह सातही मॅचमध्ये पाकिस्तानच्या कॅप्टनला मात्र फार मोठी कामगिरी करता आली नाही. अपवाद सेमी फायनलच्या सामन्याचा. पण तरीही बाबर आझमच्या नावावर या वर्ल्ड कपमध्ये लाजीरवाण्या कामगिरीचा शिक्का बसला. बाबरनं मारली नाही एकही सिक्सर यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये बाबरनं 7 मॅचमध्ये एका अर्धशतकासह 124 धावा केल्या. पण या सात मॅचमध्ये त्याला एकही सिक्सर मारता आली नाही. वर्ल्ड कपआधी बाबर चांगलाच फॉर्मात होता. पण वर्ल्ड कपमध्ये त्याला तो फॉर्म कायम राखता आला नाही. बाबर आझम आयसीसी रँकिंगमध्येही बराच काळ अव्वल स्थानावर होता. पण वर्ल्ड कपमधल्या कामगिरीनं त्याची रँकिंगही आता घसरली आहे.

News18

हेही वाचा -  Eng vs Pak Final: म्हणून इंग्लंड-पाकिस्तान फायनल खेळले… पण रोहितची ‘ही’ एक चूक आणि टीम इंडिया ‘आऊट’ फायनलमध्ये पाकिस्तान ढेर दरम्यान फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानी फलंदाजांना फार मोठी कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानला 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 137 धावाच करता आल्या. या महत्वाच्या लढतीत शान मसूदनं सर्वाधिक 38 धावा केल्या. तर बाबर आझमनं 32 धावांची खेळी केली. पण सॅम करन (3), जॉर्डन, आदिल रशिद (2) आणि बेन स्टोक्स (1) यांच्या प्रभावी माऱ्यासमोर पाकिस्तानला मोठी मजल मारता आली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात