सिडनी, 18 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपूर्वी दिग्गज क्रिकेटपटूच्या घटस्फोटाची बातमी आली होती. घटस्फोटानंतर या खेळाडूला चक्क आपल्या पत्नीला 192 कोटींची पोडगी द्यावी लागणार आहे. यासाठी आता हा खेळाडू क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता नोकरी करणार आहे. ऑस्ट्रेलियाचा चॅम्पियन खेळाडू मायकल क्लार्कवर (Michael Clarke) ही वेळ आली आहे. मायकल क्लार्कनं 8 ऑगस्ट 2015 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याआधी क्लार्कनं 2015मध्ये आपल्या संघाला वर्ल्ड कप जिंकून दिला होता. मात्र सध्या क्लार्कच्या वैयक्तिक आयुष्यात उलथापालथ झाली आहे. लग्नाच्या सात वर्षानंतर त्याचा पत्नी कायलीशी घटस्फोट होणार आहे. क्लार्कने सोशल मीडियावर या वृत्ताला दुजारा दिला. सात वर्षांपूर्वी क्लार्कचा विवाह झाला होता. कायली आणि क्लार्क यांना एक मुलगीही आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमधील संबंध बिघडले होते. एवढेच नाही तर 5 महिन्यांपासून दोघे वेगळेही राहत होते. मुख्य म्हणजे क्लार्कला आपल्या पत्नीला 192 कोटी द्यावे लागणार आहेत. वाचा- LIVE सामन्यात घुसली ‘वंडर व्हुमन’, खेळाडूंचा हात घेतला हातात आणि…
वाचा- VIDEO : सचिनच्या आयुष्यातला ‘तो’ क्षण ठरला खास, 9 वर्षानंतर मिळालं अवॉर्ड लॉरी डेलीसोबत करणार स्पोर्ट्स ब्रेकफास्ट शो मायकल क्लार्कनं निवृत्ती घेतल्यानंतर तो समालोचक म्हणून काम करत होता. मात्र आता डेली टेलीग्राफच्या बातमीनुसार, क्लार्कनं नवीन नोकरी शोधली आहे. बातमींनुसार मायकल क्लार्क आता रग्बी लीगचे दिग्गज लॉकी डेलीसोबत एका कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करणार आहे. टेरी केनेडी यांना काढल्यानंतर आता या जागी मायकल क्लार्कला ही जबाबदारी दिली आहे. वाचा- ‘या’ 4 कारणांमुळे रोहितची मुंबई पलटन पुन्हा होणार IPLचे चॅम्पियन! अफेअरमुळे झाला घटस्फोट? 2018 मध्ये ऑस्ट्रेलियन माध्यमांमध्ये, मायकल क्लार्कचे आपल्या सहाय्यकासोबत अफेअर असल्याच्या चर्चा होत्या.त्याच्या सहाय्यकाचे नाव साशा आर्मस्ट्राँग आहे. साशा क्रिकेट अकादमीचे काम सांभाळायची. याच दरम्यान, क्लार्क आणि त्यांची सहाय्यक साशाची काही फोटो सोशल मीडियावर लीक झाले हहोते. चित्रांमधून दोघांमध्ये बरीच जवळीक होती. अशा परिस्थितीत क्लार्कने या प्रकरणामुळे आपली पत्नी कायलीशी घटस्फोट घेतल्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाचा- मुंबईत जन्मलेला ‘हा’ गोलंदाज न्यूझीलंडकडून खेळणार! विराटला बाद करण्यासाठी सज्ज मायकल क्लार्कची कारकीर्द मायकल क्लार्क ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंपैकी एक आहे. 8 ऑगस्ट 2015 रोजी निवृत्ती घेतलेल्या क्लार्कने 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाला विश्वविजेता बनवले होते. क्लार्कने 245 एकदिवसीय सामन्यांमध्ये सुमारे 45 च्या सरासरीने 7981 धावा केल्या. त्याने 115 कसोटीत 49.10 च्या सरासरीने 8643 धावा केल्या. टी -20 मधील त्याची कामगिरी नक्कीच विशेष नव्हती. क्लार्कने ऑस्ट्रेलियाकडून 34 टी -20 सामन्यांत केवळ एक अर्धशतक झळकावले.

)







