Home /News /sport /

VIDEO : LIVE सामन्यात घुसली 'वंडर व्हुमन', खेळाडूंचा हात घेतला हातात आणि...

VIDEO : LIVE सामन्यात घुसली 'वंडर व्हुमन', खेळाडूंचा हात घेतला हातात आणि...

दक्षिण आफ्रिका-इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-20 मालिकेत लाईव्ह सामन्यातच एक महिला शिरली त्यामुळं सामना काही काळ थांबवावा लागला.

    सेंच्युरियन, 18 फेब्रुवारी : इंग्लडने क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्यात घरत नमवत टी -20मालिका 2-1ने जिंकली. पहिला टी-20 सामना यजमान दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता, दुसरा सामना इंग्लंडने जिंकला होता तर, सेंच्युरियन येथे झालेल्या तिसर्‍या टी -20 सामन्यात इंग्लंडने यजमानांना पराभूत केले होते. सेंच्युरियन येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात एक विचित्र प्रकार घडला. यावेळी लाईव्ह सामन्यात थेट वंडर व्हुमन मैदानात घुसली. त्यानंतर तिनं क्विंटन डी कॉकला मास्क लावण्यास सांगितले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा-VIDEO : सचिनच्या आयुष्यातला 'तो' क्षण ठरला खास, 9 वर्षानंतर मिळालं अवॉर्ड वंडर व्हुमनला पाहून खेळाडू झाले खुश मालिकेत 1-1ने बरोबरी केल्यानंतर तिसरा सामना इंग्लंड-दक्षिण आफ्रिका यांच्यात निर्णायक सामना झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ फिल्डिंग करत असताना एक महिला मैदानात आली. तिला पाहून क्विंटन डी कॉक, डेल स्टेन यांना हसु आवरता आले नाही. या वंडर व्हुमनने कर्णधार डी कॉकला मास्क दिला.मात्र दक्षिण आफ्रिकेने 5 विकेटसने हा सामना गमावला. आता दक्षिण-आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. वाचा-‘या’ 4 कारणांमुळे रोहितची मुंबई पलटन पुन्हा होणार IPLचे चॅम्पियन! वाचा-वर्ल्ड कपमध्ये अनधिकृत टीम इंडियाचा पाककडून पराभव, इमरान खान अभिनंदन करून फसले इंग्लंडने 5 विकेटनं जिंकला सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळलेला मालिका निर्णायक सामना खूप रोमांचक होता. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जेथे हेनरिक क्लिसेन 66, टेम्बा बावुमा 49, डेव्हिड मिलर- क्विंटन डी कॉकने केलेल्या 35-35 धावांच्या जोरावर 223 धावांचा डोंगर इंग्लंडपुढे ठेवला. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या 3 फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली. यात जोस बटलर 57, जॉनी बेअरस्टो 64, इयन मॉर्गन 57 यांनी शानदार खेळी केली आणि 5 चेंडू शिल्लक असताना इंग्लंड संघाने आव्हानात्मक लक्ष्य गाठले आणि 5 गडी राखून शानदार विजय मिळविला.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या