नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : भारताचा नवोदित बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावरील खेळाडूला पराभूत केलं. डेन्मार्कचा व्हिक्टर स्वेंडसनला पराभूत करून लक्ष्यने बेल्जियम इंटरनॅशनल चॅलेंजचे विजेतेपद पटकावलं. यूथ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक विजेत्या लक्ष्यने पुरुष एकेरीमध्ये फक्त 34 मिनिटात ही स्पर्धा जिंकली. त्यानं व्हिक्टरला सरळ सेटरमध्ये 21-14, 21-15 अशा फरकानं पराभूत केलं. लक्ष्यने डेन्मार्कच्या किम ब्रुनला हरवून त्यानं अंतिम फेरी गाठली होती. त्याआधी नेदरलँडचा मार्क काल्जोव स्पर्धेतून बाहेर पडल्यानं सरळ सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळाला होता. त्यापूर्वी लक्ष्यने फिनलँडच्या ईतू हेइनोला सरळसेटमध्ये हरवलं होतं. ईतूवर 21-15, 21-10 अशा फरकानं विजय मिळवला होता.
विजयानंतर लक्ष्यनं म्हटलं की, बेल्जियन इंटरनॅशनल चॅलेंजचं विजेतेपद जिंकून खूप आनंद झाला आहे. या विजयाचं श्रेय प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचं आहे. लक्ष्यने बॅडमिंटनमध्ये गेल्यावर्षी धमाकेदार कामगिरी केली होती. त्यानं यूथ ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत रौप्य पदक जिंकलं होतं. तर मिश्र प्रकारात अल्फा संघाला सुवर्णपदक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. गेल्या वर्षी त्यानं आशियाई ज्यूनिअर चॅम्पियनशिपमध्ये त्यानं जागतिक क्रमवारीत नंबर एकच्या खेळाडूवर विजय मिळवला होता. या दोन मोठ्या स्पर्धांमध्ये विजय मिळवल्यानंतर त्याच्याकडे बॅडमिंटनंच भविष्य म्हणून पाहिलं जात आहे. काही कळण्याआधीच कोसळली वीज, पाहा LIVE VIDEO