अरेरे! लाईव्ह सामन्यात थोडक्यात बचावला स्मिथ, नाही तर घशात गेली असती बत्तीशी

अरेरे! लाईव्ह सामन्यात थोडक्यात बचावला स्मिथ, नाही तर घशात गेली असती बत्तीशी

बापरे! क्षेत्ररक्षण करताना तोंडावर पडता पडता वाचला स्टीव्ह स्मिथ.

  • Share this:

अ‍ॅडलेड, 01 डिसेंबर : पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेडमध्ये होत असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करत 589 धावांचा डोंगर उभा केला. यात डेव्हिड वॉर्नरनं आपल्या आक्रमक फलंदाजीनं पहिले त्रिशतक पूर्ण केले. मात्र स्मिथला या कसोटी सामन्याच चांगली फलंदाजी करता आली नाही. दुसऱ्या कसोटी सामन्यात शाहीन आफ्रिदीनं स्मिथला आऊट केले. पहिल्या डावात स्मिथनं 64 चेंडूत 36 धावा केल्या. यानंतरही कसोटी क्रिकेटमध्ये 7 हजार धावा करणाऱ्या क्लबमध्ये स्मिथ सामिल झाला आहे.

दरम्यान, पाकिस्तानचा फलंदाजी करत असताना स्मिथचा एक भयंकर अपघात झाला. 80व्या षटकात नेथन लिऑनच्या गोलंदाजीवर यासीर शाहने त्याच्या षटकातील पाचव्या चेंडूवर एक जोरदार शॉट खेळला. यासीर 85 धावांवर फलंदाजी करीत होता. दरम्यान हा कॅच पकडण्याचा नादात स्मिथ स्लिपवरून बॅकवर्ड स्क्वेअर लेगपर्यंत धावत गेला आणि एका हाताने चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू त्याच्या हातातून काही अंतरांवर खाली पडला, मात्र स्मिथ आपला तोल सांभाळू शकला नाही आणि खाली पडला. स्मिथ खाली पडतात हवेत उंचावला, आणि स्मिथ तोंडावर आपटला. याच्यामुळे त्याच्या जबड्याला मार लागला.

वाचा-कोणाची 'सत्ती' मोठी? स्मिथ आणि पाक खेळाडूमध्ये जुंपली

वाचा-‘अनुष्काचं नाव घ्यायची काय गरज?’, वर्ल्ड कपमधल्या चहा प्रकरणावर भडकला विराट

दरम्यान यानंतर काही काळ स्मिथ वेदनेने झगडत होता. त्याने त्याच्या बाजूच्या दातांची वारंवार तपासणी केली. मात्र, यानंतर त्याने पुन्हा क्षेत्ररक्षण सुरू केले. पाकिस्तानविरुद्धच्या डे नाईट टेस्टमध्ये स्मिथला काही खास कामगिरी करता आली नाही आणि या सामन्यात तो केवळ 36 धावा करू शकला. मात्र क्षेत्ररक्षणात स्मिथनं चांगली कामगिरी केली.

वाचा-शरद पवारांशी पंगा घेणं ऑस्ट्रेलियाच्या संघालाही पडलंय महागात, पाहा VIDEO

ब्रॅडमन आणि हॅमंडचा विक्रम मोडला

मात्र, त्याने डॉन ब्रॅडमनचा विक्रमही मोडला आहे. अ‍ॅडलेडमध्ये झालेल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने 6977 धावा केल्या होत्या. जेव्हा त्याने 7000 धावा पूर्ण केल्या तेव्हा ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज डॉन ब्रॅडमनला मागे टाकले. तसेच, 1946 च्या वॅली हॅमंडचा विक्रमही त्याने मोडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7000 कसोटी धावा पूर्ण करणारा स्मिथ सर्वात वेगवान फलंदाज ठरला. हॅमंडने 131 डावात 7000 धावा पूर्ण केल्या होत्या. तर स्मिथने हे आव्हान केवळ 126 डावात पार केले.

Published by: Priyanka Gawde
First published: December 1, 2019, 5:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading