ॲडलेड, 01 डिसेंबर : पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेडमध्ये होत असलेल्या सामन्यात वॉर्नरनं जबरदस्त फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियानं या सामन्यात प्रथम फलंदाजी करत 589 धावांचा डोंगर उभा केला. यात डेव्हिड वॉर्नरनं आपल्या आक्रमक फलंदाजीनं पहिले त्रिशतक पूर्ण केले. मात्र स्मिथला या कसोटी सामन्याच चांगली फलंदाजी करता आली नाही. ॲडलेडमध्ये झालेल्या या दुसऱ्या कसोटी सामन्यात शाहीन आफ्रिदीनं स्मिथला आऊट केले. पहिल्या डावात स्मिथनं 64 चेंडूत 36 धावा केल्या. यानंतरही कसोटी क्रिकेटमध्ये 7 हजार धावा करणाऱ्या क्लबमध्ये स्मिथ सामिल झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात यासिर शाहनं स्मिथची विकेट घेतली. यानंतर यासिरनं एका वेगळ्या प्रकारचे सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनला आयपीएलमधल्या राजस्थान रॉयल्सस संघानं ट्रोल केले आहे. वाचा- ‘विराट नाही तर हा भारतीय फलंदाज मोडणार लाराचा 400 धावांचा विश्वविक्रम’ कसोटी क्रिकेटमध्ये सात हजार धावांचा आकडा पार करणारा स्मिथ हा 11वा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे. स्मिथ हा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे ट्विटरवर एका हटके अंदाजात राजस्थन रॉयल्सनं याचे सेलिब्रेशन केले. वाचा- भारताच्या कर्णधाराची लव्हस्टोरी, जेव्हा समजलं ती प्रशिक्षकाची मुलगी आहे तेव्हा..
याआधी यासिर शाहन स्मिथला बाद केल्यानंतर जल्लोष केला होता. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात शाहनं स्मिथला बाद केले. सातव्यांदा असा प्रकार घडला जेव्हा शाहनं स्मिथला बाद केले आहे. त्यामुळं स्मिथला बाद केल्यानंतर हातानं सात असा आकडा दाखवला. मात्र राजस्थान रॉयल्स संघानं शाहला तुझ्या सात पेक्षा स्मिथचा सात मोठा आहे, असे ट्वीट केले. वाचा- शरद पवारांशी पंगा घेणं ऑस्ट्रेलियाच्या संघालाही पडलंय महागात, पाहा VIDEO दरम्यान ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात 5 धावांनी विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात आपला दबदबा कायम ठेवला. यात डेव्हिड वॉर्नरनं नाबाद 335, मार्नस लॅबशॅन 162 धावांची तुफानी खेळी केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं 3 विकेट गमावत 589 धावांवर डाव घोषित केला.

)







