कोरोनाचा भीती तर बघा, सेलिब्रेशन म्हणून क्रिकेटर एकमेकांना मारत आहेत पाय, मजेशीर VIDEO VIRAL

कोरोनाचा भीती तर बघा, सेलिब्रेशन म्हणून क्रिकेटर एकमेकांना मारत आहेत पाय, मजेशीर VIDEO VIRAL

कोरोनामुळे सध्या जगभरात भीतीचे वातावरण असताना क्रिकेट सामन्यावरही याचा परिणाम होताना दिसत आहे.

  • Share this:

सिडनी, 13 मार्च : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड (Australia Vs New Zealand ) यांच्यात पहिला एकदिवसीय सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत 258 धावा केल्या. मात्र या सामन्यात न्यूझीलंडच्या खेळाडूंनी विचित्र प्रकारे सेलिब्रेशन केले. विकेट घेतल्यानंतर क्रिकेटपटूंनी एकमेकांना टाळ्या किंवा हात न मिळवता, पायाने सेलिब्रेट केले. कोरोना व्हायरसमुळे खेळाडूंनी याआधी हात मिळवू नये, असे आदेश देण्यात आले होते. त्या धर्तीवर आता खेळाडूही अनोख्या पद्धतीने जल्लोष करण्याचा निर्णय घेतला.

या सामन्यात स्टिव्ह स्मिथची विकेट घेतल्यानंतर मिशेल सेंटनर (Mitchell Santner) कोपरा मारत सेलिब्रेशन केले. सेंटनरने स्मिथला बोल्ड केले. त्यानंतर खेळाडू एकमेकांना पाय मारू लागले. न्यूझीलंडच्या या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-‘आऊट’ होऊनही फलंदाजाने केली अर्धशतकी खेळी, VIDEO पाहून व्हाल हैराण

वाचा-IPLमध्ये कोहलीच्या संघात खेळणाऱ्या क्रिकेटपटूला कोरोनाची लागण

भारतात कोरोनाचा हाहाकार

भारतात सध्या 47हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी नवी दिल्ली, उत्तर प्रदेशसह इतर राज्यांमध्ये शाळा, कॉलेज आणि थिएटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये 17 विदेशी नागरिक आहेत. दरम्यान भारतात कोरोनामुळे एकाचा मृत्यूही झाला आहे.

वाचा-कोरोनाची धास्ती! मोदी सरकारच्या प्रतिक्रियेनं IPL चा सस्पेन्स वाढला, काय होणार?

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाला कोरोनाची लागण

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू केन रिचर्डसनला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे.ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज केन रिचर्डसनला कोरोनाची लागण झाल्याची माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेटने दिली आहे. यामुळे केन ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला मुकणार आहे. केनला काही दिवसांपूर्वी खोकला आणि तापामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याची तापसणी करण्यात आल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले झाले आहे.

वाचा-भारत सरकारच्या एका निर्णयामुळे 60 खेळाडू IPL ला मुकणार, BCCI ला मोठा फटका?

भारत-ऑस्ट्रेलिया दौरा रद्द

कोरोनाव्हायरसमुळे भारत महिला संघाचा आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दौरा रद्द करण्यात आला आहे. तर, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड यांच्यातील सामने हे प्रक्षेकांशिवाय खेळले जाणार आहे. याचबरोबर सध्या भारतात सुरू असलेला भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेसाठीही या निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा आंतरराष्ट्रीय वन डे (एकदिवसीय) सामना रिकाम्या स्टेडियमवर खेळला जाईल. कोरोनाव्हायरसमुळे उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागाच्या चालू सल्लागारानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर सामन्यासाठी आतापर्यंत विकलेली सर्व तिकिटे परत केली जातील.

First published: March 13, 2020, 2:16 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading