Home /News /national /

'या' आईच्या तरी भावनांचा आदर करा, PM मोदींनी शेअर केला भावुक करणारा VIDEO

'या' आईच्या तरी भावनांचा आदर करा, PM मोदींनी शेअर केला भावुक करणारा VIDEO

लोकांनी कोरोनाची गांभीर्यता लक्षात घेऊन घरात रहावे, असे आवाहन करण्यासाठी नरेंद्र मोदींनी शेअर केला व्हिडीओ.

    नवी दिल्ली, 24 मार्च : सध्या संपूर्ण जगात कोरोनाव्हायरसने (coronavirus) हाहाकार माजला आहे. या संकटाशी दोनहात करण्यासाठी सरकारच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याच उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. तर सायंकाळी 5 वाजता वैद्यकिय कर्मचाऱ्यांचे आभार मानन्यासाठी टाळ्या वाजण्यास सांगितले होते. या कर्फ्यू दरम्यान, लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई होती. मात्र लोकांनी याकडे दुर्लक्ष केले आणि ते घराबाहेर गेले. जनता कर्फ्यूनंतर पंतप्रधान नरेंद मोदी यांनी, अद्याप लॉकडाऊन गांभीर्याने घेत नाही आहेत. कृपया हे करून स्वत: ला वाचवा, आपल्या कुटुंबास वाचवा, सूचनांचे गंभीरपणे पालन करा. मी राज्य सरकारांना विनंत्या व कायदे पाळावेत अशी विनंती करतो, असे ट्वीटही केले होते. तर आज नरेंद्र मोदींनी एक व्हिडीओ शेअर करत लोकांना या घरात राहण्याचे आवाहन केले आहे. वाचा-किराणा दुकाने या वेळेतच खुली राहणार? व्हायरल मेसेजला मुंबई पोलिसांनी दिलं उत्तर मोदींनी ट्वीट केलेल्या या व्हिडीओमध्ये एक आई आपल्या झोपडीबाहेर ताट वाजवताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना मोदींनी या आईच्या भावनांचा तरी आदर करा. जी आपल्याला एक चांगला संदेश देत आहे, असे ट्वीट केले आहे. वाचा-Coronavirus : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 14 कोटींचे मास्क केले जप्त महाराष्ट्रात लागू केली संचारबंदी मागच्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वेगान वाढ होत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. भारतात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला तर कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 400हून अधिक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात संचारबंदीची घोषणा केली आहे. याआधी महाराष्ट्रात 144 कलम लावण्यात आले होते, मात्र लोकांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळा नाईलाजास्तव मुख्यमंत्र्यांना संचारबंदी जाहीर करण्यात आली. वाचा-FACT CHECK: गोमूत्र प्यायल्यानं आणि लसूण खाल्ल्यानं कोरोना बरा होतो? जागतिक आरोग्य संघटेनेन केले भारताचे कौतुक भारताबाबत बोलायचे झाल्यास, देशातील 30 राज्य सध्या लॉक डाऊन करण्यात आली आहेत. तर, महाराष्ट्र आणि पंजाब राज्यांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. भारत सध्या दुसऱ्या टप्प्यात असला तरी, भारतात वेगाने कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारताने केलेल्या उपायांचे जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक मायकेल रेयान यांनी कौतुक केले. रेयान यांनी, भारत हा चीनसारख्या जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. चीनचे काय झाले आपण सर्वांनी पाहिले. मात्र सार्वजनिक आरोग्य पातळीवर भारताने घेतलेली आक्रमक भुमिका योग्य आहे, असे सांगितले. तसेच, लोकांच्या आरोग्य जपण्याच्या आणि जीव वाचवण्याच्या दृष्टीने भारताने घेतलेले निर्णय योग्य आहेत. भारताने ज्या प्रमाणे देवी आणि पोलिओ या दोन रोगांशी लढा दिला तसाच लढा भारत आता देत आहे, असेही रेयान म्हणाले.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या