नवी दिल्ली, 16 जानेवारी : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. यावर्षी होणाऱ्या आशिया कपचे यजमानपद पाकिस्तानकडे होते मात्र भारतानं खेळण्यास नकार दिल्यामुळे त्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता आशिया चषक पाकिस्तानमध्ये होणार नाही आहे. पाकिस्तानमध्ये आशिया कप झाल्यास भारतीय संघा पाकिस्तानच्या मैदानावर पाऊल ठेवणार नसल्याचे, याआधीच बीसीसीआयने स्पष्ट केले होते.
सप्टेंबर 2020 मध्ये टी -20स्वरूपात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानल देण्यात आले होते. मात्र यजमानपद काढून टाकल्यामुळं आता ही स्पर्धा बांगलादेश किंवा श्रीलंका येथे होऊ शकेल. एबीपी न्यूजच्या म्हणण्यानुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून यजमानपदाचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. असे म्हटले जात आहे की भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यास तयार नसल्यामुळं आयोजकांनी हा निर्णय घेतला आहे.
वाचा-पराभवानंतर टीम इंडियाचे खेळाडू झाले ‘मस्तीजादे’, शेअर केला शर्टलेस फोटो
वाचा-ऋषभ पंत राजकोट वनडेमधून बाहेर! 'या' खेळाडूला मिळू शकते संधी
याआधी 2008मध्ये पाकिस्तानमध्ये अखेरचा आशिया कप खेळण्यात आला होता. त्या स्पर्धेचा अंतिम सामना श्रीलंका आणि भारत यांच्यात खेळला गेला होता, जो श्रीलंकेने 100 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता, परंतु गतविजेता भारतीय संघाने 2018 मध्ये बांगलादेशचा पराभव केला होता. विशेष म्हणजे पाकिस्तानमधील सर्व मोठे संघ सुरक्षेच्या दृष्टीने खेळण्यास नकार देत आहेत. अशा परिस्थितीत बीसीसीआयनं भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये पाठवण्यास सक्त नकार दिला आहे.
वाचा-टीम इंडियाच्या ‘सुपरफॅन’ चारुलता पटेल यांचे निधन, कोहली-रोहितशी खास नाते
वाचा-महिला क्रिकेटरला मिळाला न्याय! बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या कोचविरोधात गुन्हा
टी -20 स्वरूपात खेळला जाणार आशिया कप
टी -20 वर्ल्ड कप 2020 ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. त्याआधी टी -20 स्वरूपात आशिया कप स्पर्धा होणार आहे, ज्याचे पाकिस्तानकडून आयोजन केले गेले होते, परंतु आता पीसीबी व आशियाई क्रिकेट कौन्सिल (एसीसी) यांच्यातील वादामुळे आता दुसऱ्या देशात स्पर्धा घ्यावी लागणार आहे. यात बांगलादेश आणि श्रीलंका या देशांची नावे आघाडीवर आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket