राजकोट, 16 जानेवारी : मुंबईत झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून लाजीरवाणा पराभव मिळाल्यानंतर भारतीय संघ राजकोटमध्ये दुसरा सामना खेळणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियानं 1-0ने आघाडी घेतली आहे. त्यामुळं राजकोटमध्ये 17 जानेवारीला होणारा सामना भारतासाठी करो वा मरो असणार आहे. दरम्यान या सामन्याआधी भारतीय संघाने जोरदार सराव केला. मात्र फिरकीपटू युजवेंद्र चहलनं शेअर केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे.
पहिल्या सामन्यात पराभव मिळाल्यानंतर चहलनं इन्स्टाग्रामवर एक शर्टलेस फोटो शेअर केला. हा फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांना त्यांना मस्तीजादे असे संबोधले आहे.
वाचा-टीम इंडियाच्या ‘सुपरफॅन’ चारुलता पटेल यांचे निधन, कोहली-रोहितशी खास नाते
चहलनं शेअर केला जिममधला फोटो
युजवेंद्र चहलने शेअर केलेल्या चित्रात त्याच्याशिवाय संघाचे फलंदाज शिखर धवन, मनीष पांडे, श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज नवदीप सैनी दिसत आहेत. सर्व खेळाडू आपले सिक्स पॅक दाखवत शर्टलेस पोझ करताना दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये चहलने, 'बॉडी मेकॅनिक्स बाय-निक वेब',असे कॅप्शन लिहिले आहे. निक वेब हे भारतीय क्रिकेट संघाचे फिटनेस कोच आहेत. चाहत्यांना या फोटोला जोरदारपणे पसंती दिली आहे. मात्र चाहत्यांना नवदीप सैनीचा लुक जास्त पसंत आला.
वाचा-उघड्यावर शौच करताना करा शंभरदा विचार, पालिकेनं आणलाय चमत्कारी आरसा!
View this post on Instagram
वाचा-महिला क्रिकेटरला मिळाला न्याय! बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या कोचविरोधात गुन्हा
भारतावर मालिका गमवण्याची भिती
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातील पहिला सामना मुंबईत खेळला गेला. या सामन्यात भारताला 10 विकेटनं निराशाजनक पराभव स्वीकारावा लागला. पहिल्यांदा फलंदाजी करतान भारतीय संघानं फक्त 255 धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून मात्र डेव्हिड वॉर्नर आणि कर्णधार अॅरोन फिंच यांनी हे लक्ष्य फक्त 37.4 ओव्हरमध्ये पार केले. मुख्य म्हणजे गेल्या 15 वर्षातील भारताचा हा सर्वात लाजीरवाणा पराभव आहे. 2005नंतर भारतानं एकही एकदिवसीय सामना 10 विकेटनं गमावलेला नाही. दरम्यान आता दुसरा सामना राजकोटमध्ये 17 जानेवारीला खेळला जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket