मेलबर्न, 13 नोव्हेंबर: यंदाच्या टी20 वर्ल्ड कप इंग्लंड संघासाठी खास ठरला. इंग्लंडनं पाकिस्तानचा पराभव करुन दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली. बेन स्टोक्स पुन्हा एकदा इंग्लंडच्या विश्वविजयाचा नायक ठरला. पण या संपूर्ण स्पर्धेत इंग्लंडच्या एका 24 वर्षांच्या युवा गोलंदाजानं कमाल केली. इतकच नव्हे तो यंदाच्या टी20 वर्ल्ड कपचा ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ही ठरला. हा आहे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळलेला युवा सॅम करन. सॅमचं आक्रमण प्रभावी फायनलमध्ये सॅम करननं पाकिस्तानच्या ती फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये धाडून इंग्लंडचा मार्ग सोपा केला. त्याचबरोबर स्पर्धेत 13 विकेट्स घेऊन स्पर्धावीराचा मानकरीही ठरला.
सॅम करनची ऐतिहासिक कामगिरी युवा सॅम करननं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा मान मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कारण आतापर्यंत टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात एकाही बॉलरला स्पर्धावीराचा मान मिळाला नव्हता. पण सॅम करननं तो इतिहास पुसून टाकला. प्लेयर ऑफ द टूर्नामेंट मिळवणारा तो पहिलाच बॉलर ठरला. त्यानं अफगाणिस्तानविरुद्ध 10 धावात घेतलेल्या 5 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.
Sam Curran is collecting 🏆#PAKvENG | #T20WorldCupFinal pic.twitter.com/UjT9C1cfMF
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 13, 2022
टी20 वर्ल्ड कपमधले स्पर्धावीर शाहीद आफ्रिदी, पाकिस्तान (2007) तिलकरत्ने दिलशान, श्रीलंका (2009) केव्हिन पीटरसन, इंग्लंड (2010) शेन वॉटसन, ऑस्ट्रेलिया (2012) विराट कोहली, भारत (2014, 2016) डेव्हिड वॉर्नर, ऑस्ट्रेलिया (2021) सॅम करन, इंग्लंड (2022) दुखापत… कमबॅक आणि घडवला इतिहास 2021 साली दुखापतीमुळे सॅम करनला इंग्लंड संघात स्थान मिळालं नाही. यूएईत झालेल्या त्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडला सुपर12 फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला होता. पण यंदा मात्र सॅम करन फिट होऊन संघात परतला. त्यासाठी त्यानं आयपीएलमधूनही आपलं नाव मागे घेतलं. महत्वाचं म्हणजे गेल्या वर्षीच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये सॅम करन कॉमेंटेटर बनला होता.
Sam Curran from 2021 to 2022 - What a comeback. pic.twitter.com/3SdY1Nnxlw
— Johns. (@CricCrazyJohns) November 13, 2022
धोनीचा कम्प्लीट क्रिकेटर 2020 आणि 2021 या दोन आयपीएल सीझनमध्ये सॅम करन चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला होता. दरम्यान सॅम करनचा खेळ पाहून धोनीनं त्याला कम्प्लीट क्रिकेटर म्हटलं होतं. धोनीच्या तालमीत तो एक टी20 क्रिकेटर म्हणून तयार झाला. आणि आज तो टी20 वर्ल्ड कपचा हीरो ठरला.