मुंबई, 09 ऑगस्ट : घरात सकारात्मक ऊर्जा राहावी, जीवनात समृद्धी येण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक प्रकारचे उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या जीवनावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत सर्व गोष्टी योग्य ठिकाणी ठेवण्याबरोबरच त्या योग्य दिशेला ठेवणेही आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार घराची बाल्कनीही महत्त्वाची असते. काही वस्तू बाल्कनीत ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. पैशाची कमतरता दूर होऊन कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून घेऊया घराच्या बाल्कनीमध्ये कोणत्या वस्तू ठेवणे शुभ मानले (Vastu Tips) जाते. तांब्याचा सूर्य - धार्मिक मान्यतेनुसार तांब्याचा धातू सूर्य आणि मंगळाशी संबंधित आहे. यासाठी घराच्या बाल्कनीमध्ये तांब्याचा धातूचा सूर्य अवश्य ठेवावा. वास्तूशास्त्रानुसार बाल्कनीच्या पूर्व दिशेला तांब्याचा सूर्य लावणे शुभ असते. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा तर नष्ट होतेच आणि आर्थिक समस्यांपासूनही सुटका मिळते. तुळशीचे रोप - हिंदू धर्मानुसार, तुळशीच्या रोपामध्ये धनाची देवी लक्ष्मी वास करते, त्यामुळे घराच्या बाल्कनीमध्ये तुळशीचे रोप लावणे शुभ असते. वास्तुशास्त्रानुसार, तुळशीचे रोप बाल्कनीच्या पूर्व दिशेला लावावे. यामुळे वास्तुदोष दूर होतात. तसेच पैशाची कमतरता दूर होऊन उत्पन्न वाढते. मनी प्लांट - धार्मिक मान्यतेनुसार कुबेर देव उत्तर दिशेला राहतात त्यामुळे मनी प्लांट देखील घराच्या बाल्कनीमध्ये उत्तर दिशेला लावावा. मनी प्लांट लावल्याने धनलाभ होण्याचे योग येत राहतात. हे वाचा - श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत लाफिंग बुद्धा - लाफिंग बुद्धाला घराच्या बाल्कनीत ठेवणेही शुभ मानले जाते. त्यामुळे नात्यात गोडवा येतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते आणि घरात सुख-समृद्धी नांदते. हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.