मुंबई, 02 सप्टेंबर : कमळाचे फूल आरोग्य, नशीब आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. कमळाचे फूल घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा तर नष्ट होतेच, शिवाय कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते. फेंगशुई शास्त्रामध्ये क्रिस्टल कमळाचे अनेक फायदे सांगितले आहेत. क्रिस्टल कमळ घरात ठेवणे शुभ मानले जाते. पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, स्फटिक कमळामुळे घरातील आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी राहते. क्रिस्टल कमळ घरी ठेवण्याचे सर्व फायदे जाणून घेऊया. क्रिस्टल कमळाचे फायदे - फेंगशुई शास्त्रानुसार घरामध्ये क्रिस्टल कमळ स्थापित केल्याने धन, सुख आणि समृद्धी वाढते. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारते. क्रिस्टल कमळामुळे घरातील वास्तुदोषही दूर होतात. क्रिस्टल कमळामुळे आर्थिक समस्यांपासूनही सुटका मिळते. यामुळे व्यक्तीला उत्साही वाटते. मन सकारात्मक राहिल्याने कोणत्याही कामात अडथळा येत नाही. क्रिस्टल कमळ कुठे ठेवावे - फेंगशुई शास्त्रानुसार क्रिस्टल कमळ योग्य दिशेला ठेवणे फायदेशीर ठरते. घरातील कोणत्याही खिडकीजवळ क्रिस्टल कमळ ठेवावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. घराच्या नैऋत्य भागात क्रिस्टल कमळ ठेवल्याने अशुभ दूर होते. कार्यालयाच्या मध्यवर्ती भागात त्याची स्थापना केल्याने संपत्ती वाढते, असे मानतात. हे वाचा - नखांच्या आकारावरूनही समजतं स्वभाव आणि बरंच काही, या टिप्स वापरून ओळखा या गोष्टी लक्षात ठेवा - फेंगशुई शास्त्रानुसार क्रिस्टल कमळ बसवण्यापूर्वी काही खास गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. क्रिस्टल कमळ घरी आणताना लक्षात ठेवा की, त्याच्या सर्व पाकळ्या पसरलेल्या असाव्यात. हे देखील लक्षात ठेवा की, तो क्रिस्टलशिवाय इतर कोणत्याही धातूचा बनलेला नसावा. त्यामुळे क्रिस्टल कमळाचा परिणाम दिसत नाही. हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.