मुंबई, 30 नोव्हेंबर : तुळस हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय आहे. अनेक जणांचा असा विश्वास आहे की, तुळशीच्या रोपाची नित्यनेमाने पूजा केल्याने, तुळशीपुढे दिवा लावल्याने घरात सदैव सुख आणि आनंद नांदते. तुळशीचे रोप असलेल्या घरात देवी लक्ष्मी वास करते असे मानले जाते. वास्तुशास्त्रात तुळशीच्या रोपाला सकारात्मक ऊर्जेचा महत्वाचा स्रोत मानले जाते.
घरात तुळस लावल्यास सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तुळस अनेक प्रकारची असते. मात्र तुम्हाला माहित आहे का? सकारत्मक ऊर्जेचा स्रोत असलेल्या तुळशीचा एक प्रकार घरात लावण्यास सक्त मनाई असते. होय, हे खरे आहे. साध्या तुळशी व्यतिरिक्त असलेली एक तुळस म्हणजेच रान तुळस घरात लावणे वर्ज्य आहे. चला तर मग जाणून घेऊया रान तुळस घरात लावल्यास काय दुष्परिणाम होऊ शकतात.
Vastu Tips : तुळशीसोबत चुकूनही ठेऊ नका ही रोपं, घरावर येतील एका मागून एक अडचणी
घरामध्ये रान तुळस लावण्याचे दुष्परिणाम
- आयुर्वेदात रान तुळस खूप फायदेशीर मानली जाते. या तुळशीचा अनेक आजारांवर उपचार म्हणून वापर केला जातो. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार, रान तुळस घरात ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता असते.
- घरात साधी तुळस असल्यास जिथे सकारात्मक ऊर्जा वाढते, तिथे रान तुळशीमुळे घरात नाकारतमं ऊर्जेचा संचार होतो आणि त्यासोबतच घरातील सदस्यांच्या प्रगतीतही बाधा येते.
- घरामध्ये रान तुळस लावल्यास राहुचा प्रभाव तीव्र होतो, त्यामुळे घरात अनेक समस्या निर्माण होण्यास सुरुवात होतात. रान तुळस कुंडलीतील राहूची दशा खराब करते आणि चंद्राची स्थिती देखील दुर्मिळ करते.
- हरजिंदगी माहितीनुसार, रान तुळस घरात लावल्याने वास्तुदोषदेखील निर्माण होऊ शकतो. या वास्तुदोषाचा मुलांच्या भविष्यावर आणि व्यक्तिमत्वावर खूप वाईट परिणाम होतो.
Fengshui Tips : फेंगशुईच्या या 10 वस्तू आहेत खूप फायदेशीर, घर-ऑफिसमध्ये ठेवल्याने वाढते संपत्ती
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.