तुळशीचे रोप हिंदू धर्मात अतिशय विशेष आणि महत्त्वाचे आहे. तुळशीला लक्ष्मीचे प्रतिरूप मानले जाते. म्हणूनच ही वनस्पती पवित्र मानली जाते आणि सकाळी आणि संध्याकाळी पूजा केली जाते. अनेक घरांमध्ये वृन्दावनामध्ये ठेवून तुळशीची नित्य पूजा केली जाते.
तुळशीला जल अर्पण करून दररोज पूजा केल्याने भगवान विष्णूही प्रसन्न होतात. शिवाय तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण आपल्यापैकी बरेच जण तुळशीच्या रोपासोबत इतरही झाडे लावतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, तुळशीच्या शेजारी काही विशिष्ट प्रकारची झाडे लावू नयेत. असे केल्याने तुळशीची शक्ती कमी होते. त्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. जाणून घेऊया तुळशीभोवती कोणती झाडे लावू नयेत.
निवडुंग : कधीही तुळस लावू नये. निवडुंगाला काटे असतात. त्यामुळे हे राहू-केतूचे प्रतीक मानले जाते. या वनस्पतीच्या माध्यमातून घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरते. त्यामुळे तुळशीच्या रोपाची शक्ती हळूहळू कमी होत जाते. हे अजिबात चांगले नाही.
तुळशीसोबत निवडुंगाचे रोप न ठेवण्याचे आणखी एक कारण आहे. राहू-केतूची दिशा नैऋत्य मानली जाते. तुळशीचे रोप ईशान्येला लावले जाते. त्यामुळे दोन झाडे कधीही शेजारी ठेवू नयेत.
शमी : तुम्ही घरी तुळशीच्या रोपासोबत शमीचे रोप लावणार असाल. तर ते किमान चार ते पाच फूट अंतरावर ठेवा. शमीचे रोप शनी दर्शवते आणि शनीची दिशा पश्चिम आहे. तर तुळशीच्या रोपाची दिशा ईशान्य आहे.
आक : काही लोक तुळशीसोबत एकाच कुंडीत आकचे रोप लावतात. मात्र हे चांगले नसते. बऱ्याचदा आकच्या झाडातून दूध बाहेर पडते आणि ते दूध तुळशीच्या रोपावर पडल्यास तुळस खराब होते.
फायकस प्लांट : फायकस प्लांटदेखील तुळशीजवळ ठेवणे देखील टाळा. हे रोप सभोवतालची ऊर्जा शोषून घेते. लोक आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी याचा वापर करतात. मात्र तुळशीच्या रोपाजवळ ठेवल्यास त्यातून मिळणारी सकारात्मक ऊर्जादेखील शोषून घेते. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)