मुंबई, 26 नोव्हेंबर : आपल्यापैकी प्रत्येकाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. यासाठी आपण खूप प्रयत्नही करतो आणि घर, व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी तसेच संपत्ती वाढवण्यासाठी वेगवेगळे उपायदेखील करून पाहातो. देशानुसार, या उपायांची पद्धत, स्वरूप वेगवेगळे असते. हे उपाय वेगवेगळ्या शास्त्रात सांगितले आहेत. यापैकी एक उपाय म्हणजे फेंगशुई वस्तू वापरणे.
काही फेंगशुई वस्तूंच्या वापराने घर आणि व्यवसायातील सर्व समस्या दूर होतात असे मानले जाते. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 उपयुक्त फेंगशुई वस्तू आणि त्यांचे परिणाम सांगणार आहोत, ज्याचा वापर प्रत्येक प्रकारे शुभ मानला जातो. पंडित रामचंद्र जोशी यांच्या मते फेंगशुई हे चिनी वास्तुशास्त्र आहे. यानुसार, 10 प्रमुख फेंगशुई वस्तू खालीलप्रमाणे आहेत.
Vinayaka Chaturthi : करिअर आणि व्यवसायात प्रगतीसाठी या विनायक चतुर्थीला अशी करा पूजा
1. लाफिंग बुध्दा
लाफिंग बुद्धाची मूर्ती ड्रॉईंग रूम, लिव्हिंग रूम आणि ऑफिस इत्यादीमध्ये ठेवल्याने सुख, समृद्धी आणि संपत्ती मिळते. घरात नेहमी आनंद असतो. त्याचे मोठे पोट विपुल संपत्तीचे प्रतीक आहे.
2. एजुकेशन टॉवर
स्टडी रूम किंवा ऑफिसच्या टेबलावर ठेवल्यास फायदा होतो. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात फायदा आणि यश मिळते. हे सकारात्मक ऊर्जा आणि एकाग्रता प्रदान करते.
3. तीन पायांचा बेडूक
तीन पायांचा बेडूक संपत्ती वाढीसाठी भाग्यवान मानला जातो. ते घराच्या आत मुख्य दरवाजाभोवती घराच्या आतील बाजूस दिसेल अशाप्रकारे ठेवावे.
4. चिनी नाणी
पैशाशी संबंधित नशीब चमकवण्यासाठी चिनी नाण्यांचा वापर प्रभावी मानला जातो. त्यांना तिजोरीत किंवा कपाटात ठेवल्याने उत्पन्न वाढते असे मानले जाते.
5. कासव
कासव हा एक शुभ प्राणी मानला जातो, जो वय वाढवतो आणि जीवनात निरंतर प्रगतीसाठी शुभ संधी देतो. आपल्या घरात किंवा दिवाणखान्यात पाण्याने भरलेल्या भांड्यात धातूच्या कासवाची मूर्ती ठेवल्याने आयुष्यात आणि वयात प्रगती होते. यापैकी ड्रॅगन हेड टर्टल हे दीर्घायुष्य आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.
6. क्रिस्टल ग्लोब
हे संपत्ती आणि यशाचे सूचक मानले जाते. त्यातून शिक्षण आणि ज्ञान वाढते. हे घर किंवा ऑफिसच्या ईशान्य दिशेला ठेवावे.
7. क्रिस्टल बॉल्स
बेडरूमचा दक्षिण-पश्चिम कोपरा क्रिस्टल बॉलने सक्रिय होतो. हे लोकांशी नातेसंबंधांमध्ये सुसंवाद निर्माण करून आनंद आणि शांती आणते.
8. विंड चाइम्स आणि चायनीज बेल
विंड चाइम्स आणि चायनीज बेल वास्तु दोष दूर करतात आणि संपत्ती, सौभाग्य आणि समृद्धी आणतात असे म्हटले जाते.
9. ड्रॅगन
ड्रॅगन चांगल्या उर्जेचे प्रतीक मानले जाते. व्यावसायिक ठिकाणी लावणे शुभ मानले जाते.
तुळशीच्या पाण्याचे हे सोपे उपाय तुमचे भाग्य बदलतील; सर्व मनोकाम होतील पूर्ण
10. लुक, बुक आणि साउ
ही उच्च दर्जाची, समृद्धी आणि दीर्घायुष्याची देवता आहे. जरी त्यांची पूजा केली जात नाही. केवळ प्रतीक म्हणून ठेवणे शुभ मानले जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.